Business Idea : निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. निरोगी राहण्यासाठी आपल्याला अनेक प्रकारच्या जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वांची आवश्यकता असते. या सगळ्यासाठी सफरचंद फळाचे नाव घेतले तर अतिशयोक्ती होणार नाही.
कारण निरोगी राहण्यासाठी डॉक्टरही आपल्याला रोज सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. रोज एक सफरचंद खाल्ल्याने तुम्ही निरोगी आणि तंदुरुस्त राहू शकता. शेतकऱ्यांचे आर्थिक आरोग्य सुधारण्यात सफरचंद शेतीची (Apple Farming) फार महत्त्वाची भूमिका आहे.
फळांमध्ये सफरचंदाला (Apple Crop) बाजारात सर्वाधिक मागणी असते. सफरचंद लागवडीतून कमी खर्चात जास्त नफा (Farmer Income) मिळू शकतो. सफरचंदाची लागवड थंड प्रदेशात जास्त होते. पण आता सफरचंदाच्या अनेक जाती (Apple Variety) विकसित झाल्या आहेत, ज्याची लागवड तुम्ही अगदी मैदानी भागातही सहज करू शकता.
हेच कारण आहे की आता महाराष्ट्रात प्रायोगिक तत्वावर अनेक शेतकऱ्यांनी (Farmer) सफरचंद पिकाची शेती (Apple Fruit Farming) सुरु केली आहे आणि यशस्वी देखील करून दाखवली आहे. यामुळे आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी सफरचंद पिकाच्या शेतीविषयी (Farming) काही महत्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत.
सफरचंद लागवडीसाठी आवश्यक हवामान
सफरचंद हे समशीतोष्ण हवामानातं वाढणारे असलेले फळपीक आहे. या पिकाची लागवड फक्त थंड प्रदेशात केली जाते. जेथे पर्वतांची उंची सुमारे 1600 ते 2700 मीटर आहे. याशिवाय 100 ते 150 सेंटीमीटर पाऊस असलेले क्षेत्र सफरचंद लागवडीसाठी सर्वोत्तम मानले जाते. सफरचंदाची झाडे मार्च-एप्रिलमध्ये फुलू लागतात. उच्च तापमानाचा पिकावर वाईट परिणाम होतो. सफरचंद बागांसाठी वार्षिक सुमारे 100 ते 150 सेमी पाऊस आवश्यक असतो. मात्र अलीकडे या पिकाच्या सुधारित जातीं विकसित केल्या असल्याने याची लागवड मैदानी भागात देखील केली जाऊ लागली आहे.
सफरचंद लागवडीसाठी योग्य जमीन
कोरडी चिकणमाती असलेली जमीन सफरचंद लागवडीसाठी योग्य मानली जाते, ज्याची खोली किमान 45 सेमी असावी. या खोलीत कोणत्याही प्रकारचा खडक नसावा, जेणेकरून झाडाची मुळे जमिनीपासून पसरून चांगली वाढू शकतील. याशिवाय जमिनीचे पीएच मूल्य 5.5 ते 6.5 असावे. सफरचंदाची लागवड पाणी साचलेल्या ठिकाणी केली जात नाही, त्यामुळे शेतात पाण्याचा निचरा करण्याची योग्य व्यवस्था असावी.
शेतीची तयारी
सफरचंदाच्या बाग लावण्यासाठी सर्वप्रथम शेताची दोन ते तीन वेळा चांगली नांगरणी करावी.
त्यानंतर शेतात रोटाव्हेटर चालवावा जेणेकरून माती भुसभुशीत होते.
यानंतर शेतात पॅड टाकून ट्रॅक्टरच्या साहाय्याने चालवा. जेणेकरून जमीन सपाट किंवा सारखी होईल.
यानंतर लागवडीसाठी 10 ते 15 फूट अंतरावर खड्डे करावेत. प्रत्येक खड्डा किमान 2 फूट खोल असावा.
यानंतर शेतात केलेल्या खड्ड्यात शेणखत व रासायनिक खते टाकून चांगले मिसळावे.
त्यानंतर शेताला पाणी द्यावे.
हे सर्व शेतात रोपे लावण्यापूर्वी एक ते दीड महिना आधी करावे लागते हे लक्षात ठेवा. जेणेकरून शेत चांगले तयार होईल आणि सफरचंदाच्या झाडाचा चांगला विकास होईल.
सफरचंद काढणी आणि छाटणी
शेतात सफरचंदाचे झाड लावल्यानंतर 4 वर्षात झाडावर फळे येऊ लागतात. या फळांची काढणी सफरचंदाच्या जातीवर आणि हंगामावर अवलंबून असते. सफरचंदांची कापणी साधारणपणे सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये केली जाते. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, सफरचंदाच्या झाडांवर फुले आल्यानंतर, सफरचंद सुमारे 5 ते 6 महिन्यांत काढणीसाठी तयार होतात.
जेव्हा सफरचंद पूर्णपणे लाल रंगाचा असतो आणि आकार देखील योग्य असतो, तेव्हा सफरचंद काढण्याची वेळ येते. एकदा तोडलेली सर्व सफरचंद त्यांच्या आकाराच्या आणि चमकाच्या आधारावर वेगळी केली जातात. त्यानंतर ही सफरचंद बाजारात विक्रीसाठी तयार होतात.
सफरचंद लागवडीतील खर्च आणि कमाई
एक हेक्टर सफरचंद लागवडीसाठी दरवर्षी सिंचनापासून काढणीपर्यंत सुमारे दीड ते दोन लाख रुपये लागतात. लागवडीनंतर 4 वर्षांनी त्यात 80 टक्के सफरचंद येतात. बाजारात त्याची मागणी जास्त असून भाव चांगला असल्याने शेतकरी यातून चांगला नफा कमवू शकतो. सध्या सफरचंदाचा भाव 140 रुपये किलो आहे. सफरचंद लागवडीतून तुम्हाला 4 ते 5 लाख रुपये प्रति हेक्टर सहज मिळू शकतात.