Business Idea: मित्रांनो बदामाचे (Almond) सेवन आरोग्यासाठी जेवढे फायदेशीर मानले जाते तेवढीचं याची शेती देखील शेतकऱ्यांसाठी (Farmer) फायदेशीर मानली जाते. बाजारात बदाम नेहमी चांगल्या किंमतीत विकले जात असल्याने या पिकाची शेती शेतकरी बांधवांना बक्कळ पैसा (Farmer Income) कमवून देते.
या पिकाची व्यावसायिक लागवड करून शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी इथे नमूद करू इच्छितो की, भारतात हिमाचल प्रदेश आणि शिमला सारख्या राज्यांमध्ये बदाम लागवड (Almond Farming) मोठ्या प्रमाणावर केली जाते. तसेच काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल झाला असल्याने आणि आधुनिक तंत्र आल्याने आता मैदानी भागात देखील बदाम पिकाची (Almond Crop) लागवड केली जात आहे.
बदामाची व्यावसायिक लागवड
बदामाची व्यावसायिक लागवड करून शेतकरी चांगला नफा कमावत आहेत. या शेतीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे बदाम पिकाला बारामाही बाजारात मोठी मागणी असल्याने शेतकऱ्यांना त्याचा माल विकण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. बदामाची लागवड अतिशय उष्ण प्रदेशात करता येत नाही. तथापि, जेव्हा त्याची फळे पिकतात तेव्हा हवामान गरम असावे.
या प्रकारच्या मातीत या पिकाची लागवड शक्य
बदाम पिकाच्या लागवडीसाठी, चांगल्या पाण्याचा निचरा होणारी चिकणमाती आणि खोल माती अत्यंत आवश्यक आहे. त्याची रोपे रोपवाटिकेत तयार केली जातात आणि मग मुख्य शेतात याची लागवड केली जाते. नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत शेतकरी या पिकाची पुनर्लावणी करू शकतात. त्याच्या सिंचनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करता येतो.
झाडाला 4 वर्षानी फळे येतात
बदामाची झाडे 3 ते 4 वर्षात फळ देण्यास सुरुवात करतात. मात्र, चांगले उत्पादन मिळण्यासाठी सुमारे 6 वर्षे लागतात. फुलोऱ्यानंतर दर 7 ते 8 महिन्यांनी त्याची कापणी केली जाते. हे झाड सुमारे 50 वर्षे फळ देत राहते. निश्चितच या पिकाची लागवड करून शेतकरी बांधव वर्षानुवर्षे चांगले उत्पन्न मिळवू शकणार आहेत.
काढणी कधी करायची?
तज्ज्ञांच्या मते, अति दुष्काळ आणि अतिवृष्टीच्या वेळी त्याची फळे तोडू नयेत. त्यामुळे बदामाचा आतील भाग खराब होण्याची शक्यता असते. त्याची काढणी काठीने किंवा हाताने फांद्या हलवून केली जाते.
इतका मिळतो नफा
बाजारात 600 ते 1000 रुपये किलो दराने बदाम विकले जातात. शेतकरी त्याची ऑनलाइन विक्रीही करू शकतात. एका झाडातून दरवर्षी सुमारे अडीच किलो सुके बदाम मिळतात. निश्चितच बदामाची 100 रोपे लावली तरी अडीच लाखांचा नफा शेतकऱ्यांना मिळू शकतो.