Business Idea: भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे मात्र असे असले तरी शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने शेतकरी बांधव (Farmer) आता शेती (Farming) नको रे बाबा असं ओरड करत आहेत.
मात्र जर शेतकरी बांधवांनी (Farmer) काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल केला आणि शेती सोबतच शेती पूरक व्यवसाय केले तर निश्चितच त्यांना फायदा होणार आहे. जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांनी केवळ शेतीवर विसंबून न राहता शेतीपूरक व्यवसाय केले पाहिजेत.
शेतीपूरक व्यवसायातून शास्वत उत्पन्न शेतकरी बांधवांना मिळत असल्याने शेतकरी बांधवांनी शेतीपूरक व्यवसायाकडे (agri business) आत वळले पाहिजे. अशा परिस्थितीत आज आम्ही आपला शेतकरी वाचक मित्रांसाठी गावात राहून तसेच शेतीसोबतच (agriculture) करता येणाऱ्या दोन व्यवसाय विषयी माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
डेअरी फार्मचा व्यवसाय:- आपल्या देशाची लोकसंख्या वाढल्याने दुधाची आणि त्यापासून बनवलेल्या पदार्थांची मागणीही वाढत आहे. ही मागणी मोठ्या कंपन्याही पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे शेतकरी बांधव शेती सोबतच 8 ते 10 जनावरे घेऊन डेअरी फार्म करू शकतात. यामुळे त्यांना शाश्वत उत्पन्न मिळणार आहे.
जनावरांकडून मिळणारे दूध बाजारात चढ्या भावाने विकले जाईल आणि चांगले उत्पन्न मिळेल. याशिवाय शेणाचा वापर सेंद्रिय खत म्हणून शेतात केला जाईल आणि शेतातूनच जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करता येईल. अशा प्रकारे शेतकरी कमी खर्चात डेअरी फार्म व्यवसाय करू शकतात. निश्चितच डेरी फार्मचा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे.
बेकरी आणि मिल व्यवसाय:- गावाजवळील शहरे आणि मोठ्या शहरांमध्ये, बेकरी उत्पादनांपासून ते तृणधान्ये आणि त्यांच्या पिठांपर्यंत खूप मागणी आहे. हा व्यवसाय माणसाच्या मुलभूत गरजांमुळे कधीच फसणार नाही, याउलट वर्षानुवर्षे लाखोंचा नफा देऊ शकतो. विशेषत: आजच्या काळात लोक आरोग्याच्या दृष्टीने सेंद्रिय आणि शुद्ध उत्पादनांची मागणी करतात. अशा परिस्थितीत, पौष्टिक धान्य, कडधान्ये आणि त्यांचे पीठ बनवण्याचे युनिट एकत्र करून बेकरी व्यवसाय करणे फायदेशीर ठरू शकते. निश्चितच हा व्यवसाय देखील शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे. शिवाय गावात राहून सुरू करता येणारा हा व्यवसाय इतर नवयुवकांना देशील करता येणार आहे.