Business Idea: देशातील शेतकरी बांधव (Farmer) आता शेतीमध्ये (Farming) मोठा बदल करत आहेत. शेतकरी बांधव आता बाजारात ज्या पिकाला चांगली मागणी आणि बाजारभाव असतो त्याच पिकांची शेती करत आहेत. यामुळे शेतकरी बांधवांना चांगला लाभ (Farmer Income) मिळत आहे.
जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना जे विकेल तेच पिकेल हा मंत्रा शेतीत वापरण्याचा सल्ला देत आहेत. अशा परिस्थितीत आज आपण बाजारात कायम मागणी मध्ये असलेल्या एका पिकाच्या शेती विषयी जाणून घेणार आहोत. मित्रांनो आज आपण व्हॅनिला (Vanilla Crop) या भारतातील सर्वात महागड्या पिकाच्या शेती विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
व्हॅनिला पिकाची भारतात खूपच कमी प्रमाणात लागवड केली जात आहे. व्हॅनिला पिकाचे फळ अगदी कॅप्सूल सारखे दिसते. बाजारात या पिकाची मागणी असते कारण की याचा वापर परफ्युम केक आणि अन्य ब्युटी प्रॉडक्ट बनवण्यासाठी केला जातो.
जाणकार लोकांच्या मते, भुसभुशीत माती व्हॅनिला शेती (Vanilla Farming) साठी अतिशय योग्य मानली जाते. ज्या जमिनीचे पी.एच. मूल्य 6.5 आणि 7.5 दरम्यान असते अशा जमिनीत या पिकाची शेती केल्यास चांगले उत्पादन मिळते. मित्रांनो कृषी तज्ञ नमूद करतात की, या पिकाची दोन प्रकारे पेरणी किंवा लागवड करता येते. यामध्ये पहिली पद्धत कटिंग लागवड करणे आणि दुसरी बियान्यामार्फत पेरणी करणे.
बियाण्याद्वारे पेरणी करणे फारच क्वचितच पसंत केले जाते, कारण व्हॅनिला धान्य फारच लहान असते, ज्यामुळे ते अंकुरण्यास जास्त वेळ घेते. त्याच वेळी, रोपांच्या माध्यमातून याची लागवड करणे खूप चांगले आहे, परंतु लागवड करण्यासाठी वापरण्यात येणारे वेल पूर्णपणे निरोगी असावे.
जाणकार लोक सांगतात की, व्हॅनिला फुले तयार होण्यासाठी सुमारे 9 ते 10 महिने लागतात. यानंतर रोपातून बिया काढल्या जातात. त्यानंतर या बियांचा वापर खाद्यपदार्थ बनवण्यासाठी केला जातो. भारतात व्हॅनिलाच्या बियांना 40 ते 50 हजार रुपये किलो असा दर मिळत असल्याचा दावा केला जातो.
अशा परिस्थितीत व्हॅनिलाची मोठ्या प्रमाणावर लागवड केल्यास कितीतरी अधिक पटीने नफा शेतकऱ्यांना मिळणार आहे. निश्चितच जर 50 हजार रुपये किलो प्रमाणे वॅनिला बियाणे विकली गेली तर शेतकरी बांधव कोट्याधीश बनणार आहेत.