Brinjal Farming : देशात गेल्या काही दशकांपासून तरकारी किंवा भाजीपाला शेती (Vegetable Farming) मोठी लोकप्रिय होतं आहे. या पिकांच्या शेतीतून शेतकरी बांधवांना लाखोंची कमाई (Farmer Income) देखील मिळतेय.
वांगे (Brinjal Crop) हे देखील असंच एक भाजीपाला पीक (Vegetable Crop) आहे ज्याची आपल्या महाराष्ट्रात देखील मोठी उल्लेखनीय लागवड आहे. उत्तर प्रदेश मधील हरदोई जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी (Farmer) देखील तरकारी पिकांच्या शेतीतून लाखोंची कमाई करून दाखवली आहे.
येथील शेतकऱ्यांनी वांगी या भाजीपाला पिकाच्या सुधारित जातींची शेती करून लाखोंची कमाई करण्याची किमया साधली आहे. हरदोई जिल्ह्यातील या शेतकऱ्यांच्या मते, एप्रिलमध्ये लावलेल्या वांग्याचे पीक पावसाळ्याच्या दिवसात चांगल्या प्रतीचे आणि अधिक उत्पादन देते. वरून जुलै-ऑगस्टपर्यंत बाजारात वांग्याची मागणीही खूप वाढते आणि शेतकऱ्यांचा मालही मंडईत चांगल्या भावात विकला जातो.
अशी करतात वांग्याची शेती
मित्रांनो वांग्याची लागवड वर्षातून दोनदा केली जाते. पहिले पीक जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान लावले जाते, जे उन्हाळ्यात तयार होते आणि दुसरे पीक एप्रिलमध्ये पेरले जाते, जे पावसाळ्यात तयार होते.
अशा परिस्थितीत शेतकरी एप्रिल महिन्यात वांग्याच्या सुधारित संकरित वाणांचे 300 ग्रॅम बियाणे प्रति हेक्टरी वापरतात.
या बिया पेरण्यापूर्वी शेतात खोल नांगरणी करून आणि कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकून जमीन तयार केली जाते.
शेवटच्या नांगरणीच्या वेळी, शेतातील तण काढून टाकले जाते आणि पॅट किंवा फळी टाकून बेड तयार केले जातात.
अशा प्रकारे वांग्याच्या बिया सपाट जमिनीवर न ठेवता बेडवर पेरल्या जातात, त्यामुळे झाडांमध्ये तणांचा त्रास उद्भवत नाही.
असे करतात वांग्याच्या पिकाचे व्यवस्थापन
वांग्याच्या चांगल्या उत्पादनासाठी शेतात चांगले सिंचनासोबतच डीएपी व द्रवरूप खताचीही फवारणी करण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
ठिबक सिंचन तंत्रज्ञानाद्वारे पाण्याबरोबरच डीएपी आणि द्रव खते झाडांना दिली गेली, ज्यामुळे पाणी आणि पोषण एकाच वेळी कार्य करू शकले.
वांग्यावरील कीड व रोगांचे सातत्याने निरीक्षण करून रासायनिक औषधांऐवजी गोमूत्र व कडुलिंबाच्या द्रावणाची फवारणी करण्यात आली.
अशाप्रकारे कीटकनाशकांचा खर्च, मेहनत आणि संसाधने वाचवून अधिक प्रमाणात वांग्याचे उत्पादन घेता येते.
वांग्याचे पीक एकदा शेतात लावले की पुढचे 10 महिने दाट उत्पादन मिळत राहते.
वांग्याचे उत्पादन व उत्पन्न
एक हेक्टर जमिनीत वांग्याची लागवड करून एकावेळी 400 क्विंटलपर्यंत वांगी मिळतात, ज्यातून दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. अशा प्रकारे 10 महिन्यांच्या पिकातून सुमारे 10 ते 12 लाखांचे उत्पन्न मिळते.
एवढेच नाही तर वांग्याची शास्त्रोक्त शेती केली आणि हवामान चांगले असेल तर हा नफा अनेक पटींनी वाढतो आणि शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळू शकते.
रिपोर्ट्सनुसार, उत्तर प्रदेशातील हरदोई येथे उत्पादीत केलेले वांगी दिल्लीतील आझादपूर मंडीपासून मध्य प्रदेश, लखनौ, कानपूर आणि फर्रुखाबादपर्यंत विक्रीसाठी जात आहे.