Brinjal Farming : वांगे (Brinjal Crop) हे एक प्रमुख भाजीपाला पीक (Vegetable Crop) आहे. या पिकाची संपूर्ण भारत वर्षात शेती (Farming) केली जाते. आपल्या महाराष्ट्रात देखील वांग्याची लागवड विशेष उल्लेखनीय आहे. वांग्याची शेती शेतकरी बांधवांना निश्चीतच फायद्याचा सौदा सिद्ध होत आहे.
मात्र असे असले तरी जाणकार लोक शेतकरी बांधवांना (Farmer) वांग्याच्या सुधारित जातींची (Brinjal Variety) लागवड करण्याचा सल्ला देतात. अशा परिस्थितीत आज आपण वांग्याच्या काही सुधारित जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया वांग्याच्या संपूर्ण भारतवर्षात लावल्या जाणाऱ्या काही प्रमुख जाती.
वांग्याच्या सुधारित जाती :-
पुसा पर्पल क्लस्टर :- ही वांग्याची जात उत्तर भारतातील मैदानी आणि डोंगराळ भागासाठी उपयुक्त आहे, त्याची फळे 10 ते 12 सेमी लांब आणि गुच्छांमध्ये असतात आणि प्रत्येक घडामध्ये सुमारे 4 ते 9 फळे येतात, त्याचे सरासरी उत्पादन 20 टन/हेक्टर असते. वांग्याच्या या प्रजातीला IARI, नवी दिल्ली या संस्थेने विकसित केले आहे.
पुसा श्यामला :- या वांग्याचे फळ लांब असते, चमकदार आणि आकर्षक गडद जांभळा रंग असतो. प्रत्येक फळाचे वजन 80-90 ग्रॅम असते. त्याची पहिली कापणी लावणीनंतर 50-55 दिवसांनी होते. त्याचे सरासरी उत्पादन 39 टन/हेक्टर आहे. वांग्याची ही जात IARI, नवी दिल्ली यांनी विकसित केली आहे.
पुसा हायब्रिड-9 :- ही वांग्याची संकरित जात आहे, त्याची फळे अंडाकृती गोलाकार, चमकदार गडद जांभळ्या रंगाची असतात. प्रत्येक फळाचे वजन 200 ते 250 ग्रॅम पर्यंत असते. वांगे लावणीनंतर पहिली कापणी 55 ते 60 दिवसांनी होते. ही जात गुजरात आणि आपल्या महाराष्ट्र क्षेत्रासाठी योग्य आहे, तिचे सरासरी उत्पादन 50 टन प्रति हेक्टर आहे.
पुसा हायब्रीड-6 :- ही वांग्याची एक संकरित जात आहे, त्याची फळे गोलाकार, जांभळी, चमकदार व मध्यम आकाराची असतात. प्रत्येक फळाचे वजन सुमारे 200 ग्रॅम असते. ही जात शरद ऋतूत किंवा हिवाळ्याच्या हंगामासाठी योग्य असते. या जातीची पहिली तोडणी लावणीनंतर 55-60 दिवसांनी केली जाऊ शकते. यापासून हेक्टरी 40 ते 45 टन उत्पादन मिळते.
अर्का नवनीत :- ही वांग्याची एक संकरित जात आहे, त्याची फळे मोठी आणि अंडाकृती आहेत, त्याचा बाहेरचा पुंजका हिरवा आहे. त्याची त्वचा गडद जांभळ्या रंगाची असते आणि फळांचे सरासरी वजन 450 ग्रॅम पर्यंत असते, त्यात कडूपणा नसतो आणि त्याची भाजी खूप चवदार बनते.