Brinjal Farming: भारतात भाजीपाला पीक (Vegetable crop) लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. भाजीपाला वर्गीय पिके कमी दिवसात आणि कमी खर्चात शेतकरी बांधवांना लाखो रुपयांचा नफा कमवून देत असल्याने अलीकडे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांची शेती (vegetable farming) करत असल्याचे चित्र आहे. मित्रांनो वांगी (Brinjal crop) हे देखील एक प्रमुख भाजीपाला पिकं आहे. वांग्याची आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात शेती (farming) केली जाते.
वांग्याच्या पिकातून शेतकरी बांधवांना कमी दिवसात चांगले उत्पन्न (farmer income) मिळते. मात्र असे असले तरी वांग्याच्या पिकात काही रोगांचे देखील सावट असते. यामुळे उत्पादनात मोठी घट होते परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील घट होत असते. लहान पानांचा रोग आणि फळ कुज हे दोन रोग वांग्याच्या पिकात प्रमुख्याने बघायला मिळतात. या रोगामुळे (brinjal disease) उत्पादनात मोठी घट होते.
या रोगावर वेळीच नियंत्रण मिळवले तर उत्पादनात होणारी घट थांबवता येते. यामुळे आज आपण या दोन रोगांवर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवले जाऊ शकते याविषयी चर्चा करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी सविस्तर.
लहान पानांचे रोग: या रोगाचा प्रादुर्भाव पाने शोषणाऱ्या किडीमुळे होतो. हा एक विषाणूजन्य आजार आहे. या रोगामुळे वांगी पिकाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या रोगात वांग्याची वरची नवीन पाने आकुंचन पावतात व लहान होतात व मूडपले जातात. या रोगामुळे पानांचा आकारही अगदी लहान राहतो व पाने देठाला चिकटलेली दिसतात.
उपाय:
यासाठी किडीचे नियंत्रण करावे लागते. कीडनियंत्रणासाठी 80 ग्रॅम ऍसिटामिप्रिड 20% एसपी किंवा 100 ग्रॅम थायमेंटॉक्सम 25% डब्ल्यूजी किंवा 100 मिली थियामेंटॉक्सम 6% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 9.5% झेडसी मिश्रण 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हे प्रमाण एक एकर क्षेत्रासाठी पुरेसे आहे.
फवारणीचे औषध आवश्यकतेनुसार 15 दिवसांनी बदलावे.
जैविक उपचार म्हणून 250 ग्रॅम बव्हेरिया बेसियाना पावडर एक एकर दराने फवारली जाऊ शकते.
फळ कुज रोग
जास्त ओलाव्यामुळे वांगी पिकात या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो. बुरशीमुळे फळांवर पाणीसारखे कोरडे ठिपके दिसतात, जे नंतर हळूहळू इतर फळांमध्येही पसरतात. प्रभावित फळांचा वरचा भाग तपकिरी होतो ज्यावर पांढरी बुरशी येते. या रोगाने बाधित झाडाची पाने व इतर भाग तोडून नष्ट करावेत जेणेकरुन रोगाचा प्रादुर्भाव रोखता येईल.
उपाय:
या रोगाच्या नियंत्रणासाठी, 600 ग्रॅम मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी किंवा 300 ग्रॅम कासुगामायसीन 5% + कॉपरऑक्सीक्लोराइड 45% डब्ल्यूपी किंवा 300 ग्रॅम हेक्साकोनाझोल 5% एससी किंवा स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट 90% + टेट्रासाइक्लिन हायड्रोक्लोराइड 10% डब्ल्यू.2 एमआय 45% 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर या प्रमाणात फवारणी करावी.
15-20 दिवसांनी फवारणीचे औषध आवश्यकतेनुसार बदलावे.
जैविक उपचार म्हणून 250 ग्रॅम स्यूडोमोनास फ्लूरोसेन्स किंवा 500 ग्रॅम ट्रायकोडर्मा व्हिरिडी 200 लिटर पाण्यात प्रति एकर फवारावे.
रासायनिक औषधाच्या संयोगाने किंवा तीन दिवस आधी आणि नंतर जैविक उपाय वापरू नका.