Borivali To Virar Railway Line : सध्या मुंबई शहर व उपनगरात रेल्वेचे कामे जलद गतीने सुरू आहेत. शहरात मेट्रो मार्ग जलद गतीने पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. तसेच रेल्वे स्टेशनच्या विकासाची कामे देखील जलद गतीने केली जात आहेत. त्यामुळे मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलमधील प्रवास आणखी गतिमान होणार आहे.
यामुळे शहरातील दळणवळण व्यवस्था अजूनच मजबूत होईल आणि वाहतूक कोंडीवर यामुळे नियंत्रण मिळवता येणार आहे. खरं पाहता, गेल्या काही वर्षांपासून मुंबई शहरातील आणि उपनगरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वधारू लागली आहे. स्वप्ना नगरी तसेच मायानगरी म्हणून जगात ख्याती प्राप्त असलेल्या मुंबईमध्ये मनात असंख्य असे स्वप्न घेऊन लाखो लोक रोजगारासाठी स्थलांतरित होत आहेत.
हे पण वाचा :- 15 ऑगस्ट पर्यंत 75 वंदे भारत एक्सप्रेस चालवणार मोदी सरकार! महाराष्ट्राला किती?
या सर्व पार्श्वभूमीवर शहरांमध्ये वाहनांची संख्या वाढत आहे, परिणामी वाहतूक कोंडी होत आहे. अशा परिस्थितीत शहरात रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आता शहरातील आठ रेल्वे स्थानकांचा विकास होणार आहे. याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एक मोठी माहिती दिली आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार बोरिवली ते विरार दरम्यान असलेली आठ रेल्वे स्थानके आता विकसित केली जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या प्रस्तावाला केंद्र शासनाकडून मान्यता मिळाली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. लोकसभेत ठाकरे गटाचे आमदार राजन विचारे यांनी या संदर्भात सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता.
या प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे. मंत्री महोदय यांनी सांगितल्याप्रमाणे, मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या बोरिवली ते विरार दरम्यान असलेल्या रेल्वे स्थानकामध्ये पाचवी व सहावी रेल्वे लाईन टाकण्याचा प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
बोरिवली ते विरार दरम्यान एकूण आठ स्थानके असून या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असल्याने आता या स्थानकांचा विकास होणार आहे. निश्चितच ही बोरिवली ते विरार दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय आनंदाची बातमी असून यामुळे रेल्वेचा प्रवास शहरात अधिक गतिमान होईल आणि यामुळे प्रवाशांची होणारी हेळसांड कमी होईल अशी आशा आहे.