Black Turmeric Farming : जर तुम्ही शेतकरी असाल किंवा तुम्ही शेतकरी कुटुंबातून येत असाल तर आजची ही बातमी विशेष तुमच्यासाठी. खरं पाहता राज्यातील शेतकरी विशेषता सांगली व आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात हळद लागवड करत असतात. या परिसरात प्रामुख्याने पिवळ्या हळदीची लागवड होते.
अनेकांना तर हळद फक्त पिवळ्या रंगाचीच असते असंच वाटतं. मात्र हळद फक्त पिवळ्या रंगाची नसते तर काळी हळद देखील असते. विशेष म्हणजे काळ्या हळदीमध्ये सामान्य हळदीच्या तुलनेत अधिक औषधी गुणधर्म आहेत. हेच कारण आहे की बाजारात या हळदीला सामान्य हळदीच्या तुलनेत अधिक मागणी आहे.
शिवाय या काळ्या हळदीला बाजारात सामान्य हळदीच्या तुलनेत अधिक बाजार भाव मिळतो. अशा परिस्थितीत जाणकार लोक शेतकऱ्यांना काळी हळद लागवड करण्याचा सल्ला देतात. दरम्यान आज आपण शेतकऱ्यांसाठी काळी हळद लागवड कशा पद्धतीने फायदेशीर ठरू शकते यासंदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काळ्या हळदीत आढळणारे औषधी गुणधर्म
तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, काळ्या हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे याचे सेवन मानवी आरोग्यासाठी विशेष लाभप्रद सिद्ध होत आहे. याचे सेवन केल्याने मानवी शरीरात रोगांशी लढण्याची शक्ती वाढवते. अशा परिस्थितीत डॉक्टर पिवळी हळद सेवन करण्याऐवजी काळी हळद सेवन करण्याचा सल्ला देतात.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! शेतकऱ्यांच्या पीककर्जासंदर्भात झाला मोठा निर्णय; राज्यस्तरीय बँकर्स कमिटीने दिलेत ‘हे’ आदेश
काळी हळद लागवड ठरणार फायदेशीर
ब्लॅक टर्मरिक ही सामान्य हळदीच्या तुलनेत बाजारात अधिक दरात विक्री होते. शिवाय याला बाजारात मोठी मागणी आहे. काळी हळद बाजारात पाचशे रुपये ते पाच हजार रुपये प्रति किलोपर्यंत विक्री होते. तसेच एकरी दहा ते बारा क्विंटल सुखी हळद मिळते. अशा पद्धतीने काळी हळद लागवड करून लाखो रुपयांची कमाई शेतकऱ्यांना होऊ शकते.
काळी हळद लागवड करतांना या गोष्टींची काळजी घ्या
काळी हळद लागवड करताना शेतकऱ्यांना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. कृषी तज्ञांच्या मते याची लागवड भुसभुशीत चिकन माती असलेल्या जमिनीत केली पाहिजे. तसेच पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत याची लागवड करणे फायदेशीर ठरते. ज्या जमिनीत अधिक पाणी साचते अशा जमिनीत याची लागवड करू नये अन्यथा पीक उत्पादनात घट होऊ शकते. हेक्टरी दोन क्विंटल बियाणे घेऊन या पिकाची लागवड करण्याचा सल्ला दिला जातो.
किती उत्पन्न मिळणार?
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या पिकाची एक एकर जमिनीत लागवड केल्यास जवळपास 50 ते 60 क्विंटल कच्च्या हळदीचे उत्पादन मिळते. तसेच एकरी दहा ते बारा क्विंटल सुखी हळद उत्पादन मिळते. प्रति किलोला 500 ते 5000 पर्यंतचा दर मिळतो. अशा पद्धतीने एकरी लाखो रुपयांची कमाई या पिकातून शेतकऱ्यांना होऊ शकते.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! ‘या’ तारखेपासून सुरू होणार नाफेडची उन्हाळ कांदा खरेदी; दरात वाढ होणार का? पहा काय म्हणताय तज्ञ