Black pepper farming: आपला भारत देश एक प्रमुख मसाला उत्पादक म्हणून ओळखला जातो. आपल्या राज्यातील कोकणात देखील मोठ्या प्रमाणात मसाला वर्गीय पिकांची शेती (Cultivation of spice crops) केली जाते. कोकणातील हवामान (Weather) मसाला वर्गीय पिकांच्या शेतीसाठी (Farming) अनुकूल असल्याने येथून शेतकरी बांधव मसाला वर्गीय पीक लागवडीतून चांगला बक्कळ पैसा (Farmers Income) छापत आहेत.
राज्यातील इतर भागातही मसाला पिकाची शेती (Spice Crops) केली जाते. आज आपण काळी मिरी या प्रमुख मसाला पिकांच्या शेती (Black Pepper Farming) विषयी जाणून घेणार आहोत. खरं पाहता याच्या शेतीतून देशातील शेतकरी बांधव (Farmer) चांगले उत्पन्न (Farmers Income) घेत आहेत. तुम्ही देखील याची शेती करू इच्छित असाल तर हे काम सुरुवातीच्या टप्प्यात तुम्ही 10,000 रुपयांमध्ये सुरू करू शकता.
चला तर मग मित्रांनो संपूर्ण शेतीची योजना जाणून घेऊया. जर तुम्ही याच्या शेतीतून भरपूर पैसे कमवण्याची तयारी करत असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक उत्तम बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत, जी पारंपरिक शेतीपेक्षा वेगळी आहे, लाखो रुपये कमवण्याची आहे. आज शेतकरी काळी मिरी शेती करून भरपूर पैसे कमावत आहेत.
मेघालयातील रहिवासी शेतकरी नानाडो मारक या शेतकऱ्याने देखील आपल्या 5 एकर जमिनीवर काळी मिरीची लागवड करून लाखो रुपये उत्पन्न कमवण्याची किमया साधली आहे. त्यांचे हे यश पाहून केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित केले आहे.
10,000 रुपयांची प्रारंभिक गुंतवणूक:- करी मुंडा नावाच्या काळ्या मिरीची जात मारक यांनी सर्व प्रथम उत्पादित केली होती. खरं पाहता ते आपल्या शेतीत नेहमी सेंद्रिय खताचा वापर करतात. त्यांनी सुरुवातीच्या टप्प्यात 10,000 रुपयांमध्ये काळी मिरीची सुमारे 10,000 रोपे लावली. जसजशी वर्षे उलटत गेली तसतशी त्यांची संख्या वाढत गेली. त्यांनी पिकवलेल्या मिरचीला जगभरात मोठी मागणी आहे. त्यांचे घर पश्चिम गारो हिल्सच्या टेकड्यांमध्ये आहे.
लोक त्यांच्या भागात प्रवेश करताच त्यांना काळी मिरीसारखा मसाल्याचा वास येऊ लागतो. गारो हिल्स हा डोंगरांनी वेढलेला वनक्षेत्र आहे. मारक यांनी झाडे न तोडता आणि पर्यावरणाची कोणतीही हानी न करता काळी मिरीच्या लागवडीची व्याप्ती वाढवली आहे.
या कामात त्यांना राज्याच्या कृषी व फलोत्पादन विभागाचेही पूर्ण सहकार्य लाभले आहे. मारक यांनी त्यांच्या शेतीसोबतच त्यांच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही शेती वाढविण्यात मदत केली आहे. नानादर बी. मारक यांनी मेघालयातील काळी मिरीच्या लागवडीत एक उत्तम उदाहरण मांडले आहे.
दिवसेंदिवस कमाईमध्ये वाढ झाली :- 2019 मध्ये त्यांनी याच्या लागवडीतून 19 लाख रुपये किमतीची काळी मिरी तयार केली होती. त्याची कमाई दिवसेंदिवस वाढत आहे. भारत सरकारने नादार बी. मारक यांनी शेतीच्या कामात केलेली मेहनत आणि समर्पण पाहता त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित केले आहे.
शेती कशी करतात:- नाडर बी मारक 8-8 फूट अंतरावर काळ्या मिरीचे रोप लावतात. दोन झाडांमध्ये समान अंतर ठेवणे महत्वाचे आहे कारण यामुळे झाडे वाढणे सोपे होते. काळ्या मिरीच्या शेंगा झाडावरून तोडल्यानंतर त्या वाळवताना आणि काढताना काळजी घेतली जाते. दाणे काढण्यासाठी ते काही काळ पाण्यात बुडवून नंतर वाळवले जाते. असे केल्याने दाण्यांना चांगला रंग येतो.
लागवडीदरम्यान, प्रति झाड फक्त 10-20 किलो शेणखत आणि गांडूळ खत घाला. मळणी यंत्राचा वापर झाडांच्या शेंगा उपटण्यासाठी देखील केला जातो ज्यामुळे तोडणीचे काम वेगाने पूर्ण होते. सुरुवातीला, काळ्या मिरीच्या शेंगांची आर्द्रता 70% पर्यंत असते, जी योग्यरित्या सुकल्याने देखील कमी होते. जर ओलावा जास्त असेल तर धान्य देखील खराब होऊ शकते.