Black Guava Farming : भारतीय शेतीमध्ये (Farming) आता बदल होतं आहे. शेतीमध्ये (Agriculture) होणारा बदल तुम्ही देखील बघत असाल. मित्रांनो अलीकडे शेतकरी बांधव प्रामुख्याने नवीन नगदी पिकांच्या लागवडीला अधिक प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.
शेतकरी बांधवांनी (farmer) आता पारंपारिक पीक पद्धतीला फाटा दिला आहे. आता अशा पिकांची शेतकरी बांधव शेती करत आहे ज्याला बाजारपेठेत मागणी आहे. अशा परिस्थितीत अलीकडे फळबाग शेती मध्ये मोठी वाढ झाली आहे. काळा पेरू (black guava crop) हे देखील एक प्रमुख फळ पीक आहे. अलीकडे शेतकऱ्यांमध्ये काळ्या पेरूची लागवड (black guava farming) करण्याची लोकप्रियता वाढली आहे.
औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते बर काळा पेरू
मित्रांनो काळा पेरू त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी विशेष ओळखले जात आहे. मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार काळ्या पेरूमध्ये आवश्यक पोषक आणि अँटिऑक्सिडेंट असतात, जे मानवी शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करतात. तसेच काळ्या पेरूच्या शेतीतुन शेतकऱ्यांना अल्प कालावधीतच चांगला नफा (farmer income) मिळत असल्याचे जाणकार सांगतात. अशा परिस्थितीत आज आपण काळा पेरू शेतीतील काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत.
आतील गीर किंवा लगद्याचा रंग लाल
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की भारतात काळा पेरू लागवड दिवसेंदिवस वाढत असून हिमाचल प्रदेशात अलीकडील काही दिवसात मोठ्या प्रमाणात याची शेती सुरु झाली आहे. तसेच उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक शेतकरी बांधवानी प्रायोगिक तत्त्वावर काळा पेरू लागवड सुरू केली आहे.
प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या या शेतीतून बिहार आणि उत्तर प्रदेश मधील शेतकरी चांगली कमाई देखील करत आहेत. मित्रांनो काळा पेरूच्या पानांचा आणि आतल्या लगद्याचा म्हणजे गीरचा रंग लाल असतो. काळा पेरूच्या एका फळाचे सरासरी वजन 100 ग्रॅम पर्यंत असते. दिसायला ते सामान्य पेरूपेक्षा जास्त आकर्षक दिसतात. शिवाय औषधी गुणांनी परिपूर्ण असल्याने बाजारात कायमच मागणी असते.
पिकावर कीटक आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो
जाणकार लोकांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीनुसार, या पेरूच्या लागवडीसाठी सामान्य पेरूपेक्षा कमी खर्च येतो. यामुळे अल्पभूधारक शेतकरी बांधवांसाठी या पेरूची लागवड विशेष फायदेशीर ठरणार आहे. मात्र काळा पेरू लागवडीसाठी थंड हवामान अधिक अनुकूल मानले जाते. त्याच्या औषधी गुणधर्मामुळे फळांवर कीड आणि रोग येण्याची शक्यताही खूप कमी होते.
पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन उपयुक्त
जाणकार लोकांच्या मते, काळ्या पेरूच्या लागवडीसाठी चांगला निचरा होणारी चिकणमाती माती उत्तम आहे. मात्र शेतकरी बांधवांनी काळा पेरू लागवड करण्यापूर्वी मातीची तपासणी म्हणजे माती परीक्षण अवश्य करून घ्यावे. यामुळे काळा पेरू लागवडीत नुकसानीची शक्यता कमी होऊन जाते. अन्यथा पीक निकामी होण्याची शक्यता असते. तज्ज्ञांच्या मते हे पीक कमी खर्चात बंपर नफा देऊ शकते. मात्र यासाठी तज्ञ लोकांचा सल्ला घेऊन शेती केली पाहिजे.
काढणी कधी केली जाते बर
मित्रांनो जसे की आपणास ठाऊकचं आहे फळबाग पिकांची वेळोवेळी छाटणी करावी लागते. यामुळे पेरूच्या इतर जातींप्रमाणे, या काळ्या पेरूची मजबूत आणि योग्य वाढ होण्यासाठी छाटणी करणे आवश्यक आहे. रोपांची छाटणी केल्याने त्याची देठ मजबूत होतात. पेरूच्या रोपाची लागवड केल्यानंतर दोन ते तीन वर्षांनी झाडाला फळे येऊ लागतात. फळे पूर्ण पिकल्यानंतर काढणी करावी. अर्थातच लागवड केल्यानंतर दोन वर्षांनी शेतकरी बांधवांना यातून उत्पादन मिळणार आहे.