Bhuimug Lagwad : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. कृषी शास्त्रज्ञांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी भुईमुगाचे एक नवीन वाण विकसित केले आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरगाव येथील भातसंशोधन केंद्राने ही किमया साधली आहे. या कृषी विद्यापीठाने तेलाऐवजी खाण्यासाठी हे नवं वाण विकसित केले आहे. या नव्या वाणाचे संशोधन पूर्ण झाले असून, उत्पादकतेची चाचणी स्थानिक शेतांमध्ये घेण्यात येत आहे.
यामुळे येत्या काही महिन्यांनी हा नवा वाण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होईल अशी शक्यता आहे. हा नवा वाण शेतकऱ्यांना उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, शेंगदाणा हा तेल पाडण्यासाठी वापरला जातो. हे प्रमुख तेलबिया पीक आहे.
याशिवाय शेंगदाण्याचा वापर हा थेट खाण्यासाठी देखील होतो. भाजलेला, उकडलेला वा कच्चा शेंगदाणा खायला अनेकांना आवडतो, मात्र, ज्या दाण्यामध्ये तेलाचे प्रमाण पेक्षा ४५% अधिक असेल ते खायला कडवट लागतात. तेलाचे प्रमाण कमी असलेला दाणा गोडसर व चविष्ट असतो.
यामुळे जे शेंगदाणा वाण फक्त तेल पाडण्यासाठी विकसित करण्यात आले आहेत ते खाण्यासाठी वापरले जात नाहीत. यामुळे सध्या गुजरात येथील भरुचा हा शेंगदाणा खाण्यासाठी योग्य असल्याने अन यामध्ये तेलाचे प्रमाण कमी असल्याने खाण्यासाठी याचा सर्रास वापर होतो.
खाण्यासाठी या शेंगदाण्याला बाजारात मोठी मागणी सुद्धा आहे. दरम्यान हीच गोष्ट विचारात घेता कोकणातील कृषी विद्यापीठाने शेंगदाण्याचा हा नवीन वाण विकसित केला आहे. आता आपण या नव्या वाणाच्या विशेषतः अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कशा आहेत नवीन वाणाच्या विशेषता
मंडळी कोकणातील कृषी विद्यापीठातील भात संशोधन केंद्राने तेल उत्पादनासाठी ‘कोकण टपोरा’ व ‘कोकण भूरत्न’ हे दोन वाण आधीच उपलब्ध करून दिले आहेत. तसेच आता खास खाण्यासाठीच्या शेंगदाण्याचे संशोधन करण्यात आले आहे.
हा नव्याने विकसित करण्यात आलेला वाण १२० ते १२५ दिवसांत तयार होणारे आहे. यात तेलाचे प्रमाण ३८ ते ४० टक्के एवढे राहणार आहे. हे वाण नुकतेच विकसित करण्यात आले असून सध्या शेतात याची उत्पादकतेची चाचणी सुरू आहे.
यामुळे हे चाचणी पूर्ण झाल्यानंतर या जातीपासून प्रत्यक्षात किती उत्पादन मिळणार हे क्लियर होईल आणि यानंतर मंजुरी मिळाल्यानंतर हा वाण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या नव्या वाणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होणार अशी आशा आहे.