Bengalore-Pandharpur Railway : पंढरपूर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. येथे आषाढी आणि कार्तिकी एकादशीला भाविकांची मोठी गर्दी होत असते. खरे तर पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शन घेण्यासाठी बारामहीने भाविकांची गर्दी असते. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील लोक पंढरपुरात विठुरायांच्या दर्शनासाठी येत असतात.
फक्त राज्यातीलच नाही तर परराज्यातील आणि विदेशातीलही भाविक पंढरपुरात येत असतात. दरम्यान, कर्नाटक राज्यातील भाविकांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बेंगलोर ते पंढरपूर दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. यामुळे कर्नाटकातील विठुरायांच्या दर्शनासाठी आतुर भाविकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
दरम्यान आता आपण बेंगलोर ते पंढरपूर दरम्यान सुरू होणाऱ्या या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक नेमके कसे राहणार या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कसे राहणार वेळापत्रक ?
विठुरायांच्या दर्शनासाठी येणाऱ्या कर्नाटक राज्यातील भाविकांसाठी बंगळूर-पंढरपूर-बंगळूर विशेष एक्सप्रेसच्या एकूण आठ फेऱ्या होणार आहेत. म्हणजे बेंगलोर ते पंढरपूर अशा चार आणि पंढरपूर ते बेंगलोर अशा चार फेऱ्या होणार आहेत.
26, 28 आणि 29 जून रोजी ही विशेष गाडी बेंगलोर येथून सायंकाळी साडेपाच वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ही गाडी पंढरपूरला सकाळी साडेअकरा वाजता पोहोचणार आहे.
परतीच्या प्रवासात ही गाडी 26, 28 आणि 29 जून रोजी पंढरपूर येथून सायंकाळी साडेसहा वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ही गाडी बेंगलोरला साडेअकरा वाजता पोहोचणार आहे.
तसेच 30 जून रोजी बेंगलोर येथून रात्री दहा वाजता विशेष एक्सप्रेस गाडी सोडली जाणार आहे आणि ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी साडेचार वाजता पंढरपूरला पोहोचणार आहे.
तसेच ही गाडी परतीच्या प्रवासात एक जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पंढरपूर रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी बंगलोर येथे सकाळी साडे अकरा वाजता पोहोचणार आहे.