Banking News : बँकिंग सेक्टर मधील आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने देशातील एका बड्या बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सदर बँकेच्या खातेधारकांमध्ये भीतीचे वातावरण असून बँकिंग सेक्टर मध्ये मोठी खळबळ माजली आहे.
खरे तर गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत आरबीआयने अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. आरबीआयने काही बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे, तर काही बँकांचे थेट परवाने रद्द केले आहेत.
मध्यवर्ती बँकांने घालून दिलेल्या नियमांचे पालन न केल्यास मध्यवर्ती बँकेकडून अर्थातच आरबीआयकडून देशभरातील खाजगी तथा सरकारी बँकांवर दंडात्मक कारवाई केली जाते.
विशेष म्हणजे काही बँकांचे लायसन्स देखील रद्द केले जातात. आरबीआय ग्राहकांचे हित जोपासण्यासाठीच ही कठोर ऍक्शन घेत असते. दरम्यान, आरबीआयने ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी पूर्वांचल सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याचा मोठा निर्णय नुकताच घेतला आहे.
मध्यवर्ती बँकेच्या नियमांचे पालन न केल्यामुळे या सदर बँकेचा परवाना रद्द करण्यात आला असून आता या बँकेला यापुढे कोणतेही बँकिंग व्यवहार करता येणार नाहीयेत. या बँकेच्या ठेवीदारांना डीआयसीजीसीकडून पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी परत मिळणार आहेत.
यामुळे या बँकेतील जवळपास 99.99% ठेवीदारांचे पैसे त्यांना परत मिळतील असे म्हटले जात आहे. त्यामुळे बँकेचा परवाना रद्द झाला असला तरी देखील याचा सदर बॅंकेच्या ठेवीदारांवर फारसा विपरीत परिणाम होणार नाहीये.
दरम्यान, आरबीआयने फक्त पूर्वांचल सहकारी बँकेचे लायसन्स अर्थातच परवाना रद्द केला आहे असे नाही तर सेंट्रल बँक ऑफ इंडियाला करोडो रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सेंट्रल बँक ऑफ इंडियाला 1.45 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामुळे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांमध्ये देखील पॅनिक वातावरण पाहायला मिळत आहे.
परंतु सेंट्रल बँक ऑफ इंडियावर झालेल्या या कारवाईचा सदर बॅंकेच्या ग्राहकांवर कोणताच विपरीत परिणाम होणार नाही. कारण की, दंडाची रक्कम ही ग्राहकांकडून वसूल होणार नसून ती बँकेकडून वसूल होणार आहे.