Banana Farming : केळीचे पीक महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्वाचे फळ पिक आहे. केळीची शेती राज्यात दिलं उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केले जाते याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात केळी लागवड होते.
एवढेच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातही केळीचे क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. शेतकरी बांधव केळीच्या वेगवेगळ्या जातींची लागवड करत आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्यांच्या निळ्या कलरची केळी उत्पादित केली आहे.
जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वाशिंबा येथील तरुण शेतकऱ्याने व्हॅनिला आइस्क्रीमचा फ्लेव्हरच्या ‘ब्लू जावा’ या जातीच्या केळीची यशस्वी शेती करून दाखवली आहे.
विशेष म्हणजे या केळीच्या पिकातून त्यांना लाखो रुपयांची कमाई या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे सध्या या तरुण शेतकऱ्याचा प्रयोग संपूर्ण पंचक्रोशीत चर्चेला आला आहे. अभिजीत पाटील असे या तरुण प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे.
या केळीची विशेषता म्हणजे याची चव गोड आणि व्हॅनिला आईस्क्रीम सारखी असते. ही केळी निळसर रंगाची दिसते. या केळीचा आईस्क्रीम बनवण्यासाठी आणि फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वापर होतो.
यामुळे या केळीला बाजारात मोठी मागणी असल्याचे कृषी तज्ञ नमूद करतात. हेच कारण आहे की या केळीच्या विशेषता पाहता तरुण शेतकरी अभिजीत पाटील यांनी गेल्या वर्षी या केळीच्या लागवडीचा विचार केला.
त्यांनी आपल्या दोन एकर जमिनीवर या केळीची लागवड केली आहे. विशेष म्हणजे यातून त्यांना आता उत्पादन देखील मिळू लागले आहे. दोन एकरात 2600 केळीची रोपे लावण्यात आली असून गेल्या आठवड्यात त्यांना यातून 50 किलोचे उत्पादन मिळाले आहे.
प्रति किलो 90 ते 100 रुपये प्रमाणे त्यांनी या उत्पादित केळीची विक्री केली. विशेष म्हणजे येत्या आठवड्याभरात या संपूर्ण केळीच्या बागेतून उत्पादन मिळू शकणार आहे. विशेष म्हणजे आत्तापासूनच व्यापाऱ्यांकडून आणि मॉलमधून या केळीची मागणी होत आहे.
या केळीच्या बागेतून त्यांना एकरी अठरा टन पर्यंत उत्पादन मिळण्याची आशा आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे या केळीला बाजारात 100 ते 150 रुपयांचा भाव मिळू शकतो.
त्यामुळे त्यांना एकरी जवळपास 18 लाख रुपयांपर्यंतची कमाई होऊ शकते. निश्चितच युवा शेतकऱ्याने केलेला हा प्रयोग इतरांसाठी देखील मार्गदर्शक राहणार आहे.