गतवर्षी शेतकऱ्यांच्या पिकांना हवामानाचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे अनेक पिके नष्ट झाली. शेतकऱ्यांना दिलासा देत महाराष्ट्र सरकारने पिकांच्या नुकसानीसाठी 1500 कोटी रुपये जाहीर केले आहेत. यामुळे गेल्या पावसात ज्या शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली होती, त्यांना दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान झालेल्या पिकांसाठी आर्थिक मदत जारी केली आहे. महाराष्ट्र सरकारने बुधवारी आर्थिक मदतीच्या नव्या हप्त्यात 1500 कोटी रुपये देण्याची घोषणा केली. पाऊस आणि हवामानामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्यांना ही रक्कम वाटली जाईल. गतवर्षी महाराष्ट्रात पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. त्या शेतकऱ्यांना दिलासा देत,…
Author: Krushi Marathi
Pune Ring Road :- पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरातील वाहतुकीची समस्या दूर व्हावी याकरिता प्रस्तावित रिंग रोडच्या पूर्व आणि पश्चिम भाग असे दोन भाग करण्यात आले असून यामध्ये पश्चिम भागाचा रिंग रोड पाच टप्प्यात तर पूर्व भागाचा रिंगरोड चार टप्प्यात विकसित केला जाणार आहे. हा रिंगरोड महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून बांधण्यात येणार असून सध्या यासाठीचे भूसंपादनाचे काम सुरू आहे. या रिंग रोड साठी 15000 कोटी रुपये एकूण बांधकामासाठी तर 12000 कोटी रुपये यासाठी लागणाऱ्या भूसंपादनासाठी लागणार आहेत. असेल यातील 31 किलोमीटरचा जो टप्पा आहे त्याचे बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याचा अनुषंगाने…
महाराष्ट्राच्या परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या कापूस पावसापासून संरक्षण करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी खरेदी बंद राहणार आहे. आता 20 जूनपर्यंतच खरेदी होणार आहे. दरम्यान, कापसाच्या दरातील चढ-उतार सुरूच आहे. मान्सूनच्या पावसाच्या सतर्कतेमुळे कापूस खरेदीवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण अनेक मंडईंमध्ये कापूस पावसापासून वाचवण्याची व्यवस्था नाही. अशीच अवस्था महाराष्ट्राच्या परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी मंगळवार, २० जूनपर्यंत कापूस विकण्याचे आवाहन बाजार समितीने केले आहे. कारण पाऊस पाहता 21 जून, बुधवारपासून खरेदी बंद राहू शकते. सध्या चालू हंगाम 2022-23 साठी परभणी मंडईतील कापूस यार्डात व्यापाऱ्यांमार्फत जाहीर लिलावाद्वारे कापूस खरेदी…
कृषी विभागामार्फत निरीक्षकांनी केलेल्या तपासणीमध्ये दोषी आढळून आलेल्या ४ बियाणे विक्री केंद्राचे व २ किटकनाशके विक्री केंद्रांचे परवाने निलंबीत करण्यात आले आहेत.निविष्ठा उत्पादकांनी किंवा जिल्हयामधील निविष्ठा विक्री केंद्र चालकांनी कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन करु नये अन्यथा त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. खरीप हंगाम सुरु झालेला असुन बाजारामध्ये शेतक-यांची बि-बियाणे, खते व इतर कृषि निविष्ठा खरेदीसाठी लगबग सुरु झालेली आहे. खरीप हंगाम सन २०२३-२४ साठी शेतक-यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा व्हावा यासाठी कृषि विभागाने सूक्ष्म नियोजन केलेले आहे. जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर निविष्ठा उपलब्धता…
Soybean Seed Price : महाबीजच्या खरीप हंगामाच्या बियाण्यांची उपलब्धता गेल्या वर्षीपासून वाढली आहे. त्यामुळे भाव खाली येत आहेत. त्यामुळे बाजारातील अन्य कंपन्यांनाही यंदा सोयाबीनचे दर कमी ठेवावे लागत आहेत. गतवर्षी बियाणांची उपलब्धता कमी असल्याने महाबीज सोयाबीनचे भाव गगनाला भिडले होते. सोयाबीनच्या कमी भावाच्या समस्येने त्रस्त असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. त्यांना खरीप हंगामासाठी सोयाबीनचे बियाणे स्वस्तात मिळू शकणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ‘महाबीज’च्या सोयाबीन बियाणांच्या दरात दहा ते अकरा हजारांनी प्रति बॅग घट झाली आहे. यंदाच्या खरीप हंगामात ‘महाबीज’ने सर्व प्रकारच्या सुमारे 2 लाख 25 हजार क्विंटल बियाण्यांची विक्री करण्याचे नियोजन केले आहे. ज्यामध्ये सोयाबीन बियाणांचा सर्वाधिक वाटा…
प्रियदर्शनी पार्क येथे टीबीएम यंत्राने खोदाईची अखेर करून बोगदा पूर्ण करताच, याठिकाणी काम करणारे अभियंते, अधिकारी, कर्मचारी-कामगारांनी एकच जल्लोष केला. आपण सर्व एका महत्त्वपूर्ण क्षणाचे साक्षीदार ठरल्याचे कौतुकोद्गारही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी काढले. समुद्राखालून जाणाऱ्या रस्त्यांसाठी विविध अत्याधुनिक सुविधा असून स्थानिक कोळीवाड्यातील भूमिपुत्रांनाही विश्वासात घेतले आहे. समुद्रातील दोन खांबांमधील अंतरही त्यादृष्टीने १२० मीटरचे केले आहे. सर्वांना सोबत घेऊन हा प्रकल्प पुढे नेला आहे. पर्यावरणीय अशा सर्व गोष्टींची काळजी घेतली आहे. केंद्राकडून विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून पाठबळ दिले आहे. मुंबईची वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल, यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळेस सांगितले. या प्रकल्पातील बोगदा खोदाई…
Crop Insurance Scheme :- राज्यात सर्व समावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरुन पीक विमा योजनेचा लाभ देण्यात येईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई निश्चितीसाठी पिकांचे सरासरी नुकसान काढताना किमान 30 टक्के तंत्रज्ञान आधारित उत्पादन व पिक कापणी प्रयोगांतर्गत प्राप्त होणाऱ्या उत्पादनाचा मेळ घालून उत्पादन निश्चित करण्यात येईल. ही योजना खरीप व रब्बी हंगाम 2023-24 ते 2025-26 या तीन वर्षाच्या कालावधीसाठी निविदा प्रक्रीयेने राबविण्यात येईल. विमा हप्ता दरांच्या तुलनात्मक माहितीच्या आधारे नफा…
मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पातील दुसऱ्या बोगद्याचे काम ९९.३६ टक्के झाले असून, अंतिम टप्प्यात आहे. या बोगद्याचे काम १६ मीटर शिल्लक असून येत्या सोमवारी किंवा मंगळवारी मान्यवरांच्या उपस्थितीत दुसऱ्या बोगद्याचा ब्रेक थ्रू होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला. दरम्यान, टनेल बोअरिंग मशीन (मावळा) ने शिखर गाठल्याने येत्या नोव्हेंबर अखेरपर्यंत कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचे नियोजन पालिका प्रशासनाचे असल्याचे सांगण्यात आले. कोस्टल रोड हा मुंबई महापालिकेचा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. कोस्टल रोड प्रकल्पात दोन भूमिगत बोगदे खोदण्यात आले आहेत. एका बोगद्याचे काम १० जानेवारी २०२२ रोजी पूर्ण झाले. तर दुसऱ्या बोगद्याचे काम ९ एप्रिल २०२२ मध्ये…
Mukhyamantri saur krishi Vahini 2023 :- महाराष्ट्र राज्यात सुमारे 45 लाख कृषी वीज ग्राहक असून देशातील शेतीच्या विद्युत पंपामध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वात मोठा आहे. राज्यामध्ये ऊर्जेच्या एकूण वापरापैकी कृषी क्षेत्रासाठी सुमारे २२ टक्के ऊर्जेचा वापर होत असून प्रामुख्याने या वीजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो. सध्या शेतकऱ्यांना चक्रीय पद्धतीने दिवसा व रात्री वीजपुरवठा केला जातो. अशाप्रकारे वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांची खूप गैरसोय होते, रात्रीच्या वेळी शेतात सिंचन करताना वन्य प्राणी, साप चावणे, इत्यादी धोक्यांचा सामना करावा लागतो. या समस्या सोडविण्यासाठी दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून सातत्याने होत होती. या सर्व गोष्टींचा विचार करुन राज्यातील शेतकऱ्यांना शेतीपंपाना दिवसा वीज…
कापूस, सोयाबीन व तूर ही प्रमुख खरिपाची पिके असून त्यांचे लागवड क्षेत्र व उत्पादकताही जास्त आहे. आगामी खरीप हंगामात एकूण ४ लाख ६९ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, कापूस, तूर, मूग उडीद, इत्तर पिक पेरणीचे नियोजन आहे. त्यापैकी सोयाबीनचे २ लाख ३२ हजार हेक्टर, कापसाचे १ लाख ६० हजार हेक्टर, तूर ५७ हजार ५०० हेक्टर, मूग १० हजार हेक्टरवर पेरणी करण्याचे नियोजन आहे. इतर पिकांच्या तुलनेत सोयाबीनचे पेरणीचे क्षेत्र जास्त आहे. हमखास उत्पन्न व चांगला बाजार भाव यामुळे दरवर्षी सोयाबीनच्या पेऱ्यात वाढ होत आहे. सोयाबीनच्या उत्पादनवाढीसाठी कृषी विभागाकडून वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. सोयाबीनसाठी घरचेच बियाणे वापरणे यामुळे खर्चात बचत…