अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हयातील सहा कृषि सेवा केंद्राचे विक्री परवाने निलंबीत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कृषी विभागामार्फत निरीक्षकांनी केलेल्या तपासणीमध्ये दोषी आढळून आलेल्या ४ बियाणे विक्री केंद्राचे व २ किटकनाशके विक्री केंद्रांचे परवाने निलंबीत करण्यात आले आहेत.निविष्ठा उत्पादकांनी किंवा जिल्हयामधील निविष्ठा विक्री केंद्र चालकांनी कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन करु नये अन्यथा त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

खरीप हंगाम सुरु झालेला असुन बाजारामध्ये शेतक-यांची बि-बियाणे, खते व इतर कृषि निविष्ठा खरेदीसाठी लगबग सुरु झालेली आहे. खरीप हंगाम सन २०२३-२४ साठी शेतक-यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा व्हावा यासाठी कृषि विभागाने सूक्ष्म नियोजन केलेले आहे. जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक तालुकास्तरावर तक्रार निवारण समितीही कार्यरत आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

शेतक-यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठांची उपलब्धता व्हावी, कमी दर्जाच्या निविष्ठांमुळे फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हास्तरावर १ व प्रत्येक तालुका स्तरावर १ अशी एकुण १५ भरारी पथके जिल्हयामध्ये कार्यरत करण्यात आलेली असून भरारी पथकामार्फत निविष्ठा विक्रेत्यांची अचानक तपासणी केली जात आहे. शेतक-यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक करणा-या विक्री केंद्रावर तातडीने कारवाई केली जाणार असल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.