Author: Krushi Marathi

Pune Metro Ticket :- पुणे मेट्रोची ‘पीसीएमसी ते फुगेवाडी’ व ‘वनाझ ते गरवारे महाविद्यालय’ या मार्गिकेवर मागील वर्षी उद्घाटन झाले होते. आज मंगळवारी (दि. १ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दोन्ही मार्गिकांचा विस्तार केला जात आहे. या विस्तारित मार्गांमध्ये ‘फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट’ आणि ‘रूबी हॉल ते गरवारे महाविद्यालय’ या मार्गांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या नवीन मार्गांच्या लोकार्पणामुळे ‘पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट’ आणि ‘वनाझ ते रुबी हॉल’ या मार्गांवर प्रवास करणे शक्य होणार आहे. मेट्रोचे न्यूनतम भाडे १० रुपये असून, अधिकतम भाडे ३५ रुपये असणार आहे. ‘पीसीएमसी ते वनाझ’ असा प्रवास करण्यासाठी ४०…

Read More

सासवड : पुरंदर तालुका नेहमीच दुष्काळी म्हणून ओळखला जातो, तर तालुक्‍याचा पूर्व भाग दुष्काळाचे आगारच. कारण, या भागातील नागरिकांना केवळ पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. पावसाळा संपला की लगेच टँकरची तासन्‌तास वाट पाहावी लागते. अलीकडच्या काळात पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून बर्‍यापैकी प्रगती झालेली दिसून येते. याच भागातील पिसवेच्या संतोष विनायक म्हस्के या युवा शेतकऱ्याने जिद्द, चिकाटी, कष्ट करण्याच्या तयारीच्या जोरावर कुटुंबाच्या मदतीने विविध प्रकारची फळपिके घेऊन आदर्श निर्माण केला आहे. केवळ फळपिके घेऊन वर्षाला लाखो रुपये कमवत आहे. पुरंदर तालुक्‍याच्या पिसर्वेतील प्रयोगशील शेतकरी संतोष विनायक म्हस्के यांना लहानपणापासून शिक्षक होण्याची आवड असल्याने त्यांनी डी.एड. करून पुढे एम.ए.चे शिक्षण घेतले.…

Read More

ITR Filling Last Date :- आयकर रिटर्न सबमिट करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 6 कोटींहून अधिक लोकांनी त्यांचा आयकर जमा केला आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हीही आयकराच्या कक्षेत येत असाल तर लवकरात लवकर तुमचा ITR सबमिट करा. जर तुम्ही आयकराच्या कक्षेत येत असाल तर ITR दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस म्हणजे ३१ जुलै आहे. या तारखेपर्यंत तुम्ही तुमचा ITR सबमिट न केल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. यासोबतच तुमच्या आर्थिक प्रोफाइलवरही त्याचा नकारात्मक प्रभाव पडेल. प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 30 जुलै रोजी संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत 6 कोटींहून अधिक लोकांनी आयटीआर जमा केला होता. यापैकी…

Read More

Land Registration :- तुकडेबंदी कायदा असूनही जमिनींचे तुकडे पाडून दस्तनोंदणी करण्यात येत होती. याबाबत गैरप्रकार समोर आल्यानंतर अशा प्रकारच्या जमिनीची खरेदी-विक्री करायची असल्यास संबंधित क्षेत्राचे ले-आऊट करून जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी बंधनकारक करण्याचे परिपत्रक काढले होते ते रद्द करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. याविरोधात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने खंडपीठाच्या निर्णयाला दोन महिन्यांची स्थगिती दिली आहे. त्यामुळे दोन महिने तुकड्यांतील जमिनीची दस्तनोंदणी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने १२ जुलै २०२१ रोजी तुकडेबंदी, तुकडेजोड सुधारणा अधिनियमाच्या कलम ब नुसार परिपत्रक जारी केले होते. त्यानुसार एक-दोन-तीन…

Read More
Mumbai News

पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडण्यासाठी मुंबई पालिकेने गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता हा महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत पश्चिम उपनगरामध्ये गोरेगाव येथील चित्रनगरी ते पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड येथे खिंडीपाडापर्यंत जुळा व भूमिगत बोगदा बांधण्याचे प्रस्तावित आहे. या बोगद्याच्या बांधकामासाठी सुरू असलेली निविदा प्रक्रिया यशस्वी ठरली आहे. यामध्ये सर्वांत कमी किमतीची बोली जे कुमार- एनसीसी जेव्ही यांनी लावली आहे. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारे सांताक्रुझ-चेंबूर, अंधेरी-घाटकोपर, जोगेश्वरी-विक्रोळी हे तीन जोडरस्ते आहेत. मात्र, दोन्ही उपनगरांमधील वाढती लोकसंख्या, वाहनांची वर्दळ लक्षात घेता गोरेगाव-मुलुंड हा चौथा जोडरस्ता बांधण्याचा प्रकल्प बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला आहे. सुमारे १२.२० किलोमीटरच्या या रस्त्यामुळे गोरेगाव ते मुलुंड हे अंतर…

Read More

पुणे, पिंपरी चिंचवड शहरासारख्या ठिकाणी घर घेण्यासाठी नागरिक आपल्या आयुष्याची कमाई लावतात. अशा प्रसंगी फसवणूक झाल्यास खूप मोठा धक्का बसतो यासाठी शासनाने ‘रेरा’ची स्थापना केली. यामुळे काही प्रमाणात बेकायदा बांधकामांबाबत आळा बसला आहे. मात्र, अनेक गृहप्रकल्प नोंदणी केल्याची ग्राहकांची फसवणूक करतात यामुळे महारेराच्या नोंदणी ग्राहकांनी कायदेतज्ज्ञांकडून तपासून घेण्याचा सल्ला दिला जात आहे. केंद्र सरकारच्या महारेरा कायदयाची २०१७ पासून अंमलबजाणी करण्यात येवू लागली. त्यानुसार बांधकाम व्यवसायिकांना महारेराकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कायद्यानुसार बांधकाम व्यवसायिकाने कमिन्समेंट सर्टिफिकीट घेतल्यावर गृहप्रकल्पाची नोंदणी केली जाते. सुमारे ५०० स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेला किंवा आठपेक्षा जास्त सदनिका विक्री करणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला ‘महारेरा’कडे नोंदणी करणे…

Read More

Pune Ring Road :- रिंगरोडचे संपादन करताना जमिनींवर आधी बागायती, हंगामी बागायतीचे शिक्के असताना आता जिरायतीचे शिक्के मारून त्याप्रमाणे भाव दिला जात आहे, असे करणे अन्यायकारक आहे. प्रशासनाने हंगामी बागायती, बागायती हे शेतकऱ्यांचे दावे मान्य करून मोबदला द्यावा, मोबदल्यात पाचपट वाढ करावी, अशा विविध मागण्यांसाठी बुधवारी शेतकरी हक्क समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. हवेली तालुक्यातील राठवडे, वरदाडे, सांगरून, तातवडी, बाहुली आदी गावांतील शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आपले म्हणणे मांडले. रिंगरोडसाठी जमिनी संपादित करून त्याचा मोबदला देण्याची सुरुवात प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मात्र, हवेली तालुक्यातील बाधित गावांमध्ये भूसंपादन अधिकाऱ्यांनी जमिनीची नोंद आधी बागायत अथवा हंगामी…

Read More

सध्या सर्वत्र स्टील, विटा, सिमेंटचे दर घसरले आहेत. मात्र, वाळूच्या दराने उच्चांक गाठल्याने सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न अधुरेच राहिले असल्याचे चित्र राहुरी तालुक्यासह जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. सहाशे रुपये प्रति ब्रास वाळूचे धोरण फक्त कागदोपत्रीच आहे. की काय ? असाच काहीसा प्रश्न सध्या सर्वसामान्य जनतेमधून उपस्थित केला जात आहे. मागील दोन ते तीन वर्षांचा विचार केला तर स्टीलचे दर सुमारे १५ ते २० टक्क्यांनी घटले आहेत. सिमेंटच्या दरामध्येही काही प्रमाणामध्ये घसरण झाली आहे. विटांचे दर स्थिर आहेत. महसूल व पोलिस प्रशासनाच्या आशीर्वादामुळे सर्रास वाळू उपसा सुरू आहे. वाळू तस्करांकडून अधिकाऱ्यांना पैशाच्या स्वरूपात मलाई पोहोच होत आहे. त्यामुळे वाळूच्या दराने उच्चांक…

Read More

पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्‍यातील वेळू गावाचे प्रयोगशील शेतकरी गुलाब महादेव घुले यांची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यांनी दोन एकर शेताच्या बांधावर शेवग्याची लागवड केली आहे. त्या झाडांना आता चांगल्याच शेंगा आल्या आहेत. त्यांची विक्रीसुद्धा अधिक प्रमाणात होत असल्यामुळे शेतकरी गुलाब घुले यांना त्याचा फायदा होत आहे. ‘ओडिसी शेवगा’ असा प्रकार आहे. विशेष म्हणजे त्यांनी लागवड केलेल्या झाडाला साडेचार फूट लांबीच्या शेवग्याच्या शेंगा लागल्या आहेत. सध्या ही शेती सगळ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्‍यातील वेळू गावाचे शेतकरी पुत्र गुलाब महादेव घुले यांनी शेवग्याच्या शेंगाचे वाण लावून शेवग्याचे भरघोस उत्पादन घेतले आहे. दोन एकर क्षेत्रावरील शेतीच्या बांधावर शेवग्याची…

Read More

Milk Rates Maharashtra : राज्यात दुधाला किमान भाव मिळावा, दुधाच्या खरेदी दरात कपात होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये या उद्देशाने गायीच्या दुधाला प्रतिलिटर किमान ३४ रूपये भाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतल्याची माहिती दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. राज्यातील दूध दर प्रश्नाबाबत विविध दूध उत्पादक शेतकरी संघटना व पशुखाद्य उत्पादक प्रतिनिधींसोबत पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच महत्त्वाची बैठक झाली. सहकारी आणि खासगी दूध संघांचा परिचालन खर्च, तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च विचारात घेऊन, शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त भाव मिळावा, या अनुषंगाने दूध दर निश्चितीसाठी शासन निर्णयान्वये समिती गठित करण्यात आली…

Read More