Author: Krushi Marathi

Read Latest Krushi News & Articles Including, Market Prices, Government Schemes, Politics, Weather, Success Stories In Marathi, Read Trending Stories Of कृषी बातम्या, बाजारभाव, सरकारी योजना, राजकारण, हवामान, यशोगाथा विषयक माहिती मराठी भाषेत

Soybean Farming

Soybean Farming : सोयाबीन हे राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड होते. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांना परवडत नसल्याची वास्तविकता आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव सुद्धा मिळत नाहीये. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीनची विक्री करावी लागत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की केंद्रातील मोदी सरकारने सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये हमीभाव घोषित केला आहे. पण, त्या दराने देखील महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सोयाबीन खरेदी केले जात नाहीये. फारच कमी शेतकऱ्यांना हमीभावा एवढा दर मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान…

Read More
Maharashtra Rain

Maharashtra Rain : महाराष्ट्रात दिवाळीच्या काळात पाऊस सुरू होता. त्यामुळे यंदा राज्यात थंडीला उशिराने सुरुवात झाली. दिवाळीनंतर राज्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली. उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी भरवणारी थंडी जाणवू लागली. मात्र असे सुरू असतानाच गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यात पावसाने दणका दिला. कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावल्याची नोंद करण्यात आली. यामुळे आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील थंडीची लाट थोडीशी कमी झाली आहे. थंडीची तीव्रता वाढणार असे संकेत मिळत असतानाच पावसामुळे राज्यातील बहुतांशी भागांमधील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू झाली आणि याचा परिणाम म्हणून राज्यातील थंडीची लाट आता थोडीशी ओसरलेली आहे. मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये…

Read More
Pune News

Pune News : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर, आयटी हब म्हणून नावारूपाला आलेल्या पुणे शहरातील नागरिकांसाठी विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी कडून जोरदार प्रचार सुरू आहे. पण, येत्या काही तासात विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचाराचा झंझावात शांत होणार आहे. अशातच पुणेकरांसाठी गुड न्यूज समोर आली आहे. पुणेकरांना वंदे भारत स्लीपर ट्रेन ची भेट मिळणार असल्याची बातमी हाती येत आहे. भारतीय रेल्वेने सुरू केलेल्या वंदे भारत एक्सप्रेस ला प्रवाशांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. ही गाडी 2019 मध्ये सुरू झाली. सध्या देशातील 65 महत्त्वाच्या मार्गांवर…

Read More
Soybean Farming

Soybean Farming : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. याची लागवड राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये होते. मात्र सध्या सोयाबीनला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आले आहेत. यामुळे याचा विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना फटका बसण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रातील 60 पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघात सोयाबीनचा मुद्दा वरचढ ठरण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आता सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी राज्य कृषी मूल्य आयोगाने नुकतीच एक मोठी घोषणा केली असून यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात वातावरण फिरण्याची शक्यता आहे. या घोषणामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फायदा…

Read More
Vande Bharat Sleeper Train

Vande Bharat Sleeper Train : सध्या देशात वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या चर्चा सुरू आहेत. खरे तर वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर आता रेल्वे कडून वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील सुरू केली जाणार आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतीय रेल्वेने वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरू केली. आता वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील येत्या काही दिवसांनी रुळावर धावताना दिसणार आहे. दरम्यान याच स्लीपर ट्रेन संदर्भात केंद्रीय मंत्री व्ही. सोमन्ना यांनी गुरुवारी मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री सोमन्ना यांनी सांगितल्याप्रमाणे कर्नाटक राज्यातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन पुढील महिन्यापासून रुळावर धावणार आहे. ही ट्रेन बेंगळुरू-बेलागावी दरम्यान धावणार आहे. बेळगावी येथील एका खाजगी हॉटेलमध्ये…

Read More
PM Awas Yojana

PM Awas Yojana : पीएम आवास योजनेबाबत एक मोठी अपडेट हाती आली आहे. खरे तर ही योजना 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही केंद्रीय योजना संपूर्ण देशभरात लागू असून या अंतर्गत आत्तापर्यंत कोट्यावधी लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या योजनेतून घर बांधण्यासाठी अन खरेदी करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. घरासाठी घेतलेल्या होम लोन वर आकारल्या जाणाऱ्या व्याजेसाठी सुद्धा सवलत दिली जाते. दरम्यान आता याच योजनेबाबत केंद्रातील सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीएम आवास योजनेसाठी आता नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार…

Read More
Who Is India's Richest Beggar

Who Is India’s Richest Beggar : अन्न वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा. मात्र काही लोकांना आजही या तिन्ही गरजा पूर्ण करता येत नाहीत. काही लोकांना तर दोन वेळेचे जेवण सुद्धा मिळत नाही. म्हणून अनेक जण भीक मागून आपले पोट भागवतात. भीक मागून जीवन जगणे फारच वाईट आणि मनाला चटके देणारे. पण, तुम्हाला आज आम्ही अशा एका व्यक्तीची माहिती सांगणार आहोत जो की कोट्यावधी रुपयांच्या घरात राहतो पण भिक मागून आपलं जीवन चालवतो. मित्रांनो तुम्हाला भारतातील सर्वात श्रीमंत भिकारी कोण आहे याची कल्पना आहे का ? कदाचित नसेल म्हणून आज आपण या श्रीमंत भिकाऱ्याची माहिती पाहणार आहोत. खरेतर, भारतात…

Read More
Vande Bharat Sleeper Train

Vande Bharat Sleeper Train : रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे 2025-26 पर्यंत बहुप्रतीक्षित वंदे भारत स्लीपर ट्रेन्स लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे, ज्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी एक नवीन स्तरावरील आराम आणि सुविधा मिळेल. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे 2025-26 या आर्थिक वर्षात 10 नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची योजना आखत आहे. या ट्रेन्समध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सर्वोत्तम दर्जाचे इंटिरियर असेल. यामुळे प्रवाशांना उत्तम दर्जाच्या सोयी सुविधा मिळतील आणि त्यांचा प्रवास देखील आरामदायी होणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन कधी लॉन्च होणार? भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन 2025 मध्ये आवश्यक ट्रायल अन चाचणीनंतर सुरू होण्याची शक्यता…

Read More
Mumbai News

Mumbai News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात संपूर्ण देशात रस्ते विकासाच्या अनेक प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. अनेक मोठमोठ्या महामार्गांची कामे पूर्ण झालीत. यामुळे रस्ते वाहतूक आधीच्या तुलनेत अधिक मजबूत झाली असून त्यामुळे देशाच्या एकात्मिक विकासाला चालना मिळत आहे. खरे तर कोणत्याही विकसित देशात तेथील रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर, रेल्वे, कनेक्टिव्हिटी महत्त्वाची भूमिका निभावत असतात. हेच कारण आहे की विकसित भारताचे स्वप्न आपल्या डोळ्यापुढे ठेवून 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने रस्ते रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामांवर अधिक जोर दिला आहे. मुंबईमध्ये देखील रस्ते विकासाची अनेक कामे गेल्या काही वर्षांमध्ये पूर्ण झाली असून अजूनही अनेक कामे सुरू आहेत. तसेच भविष्यात आणखी काही कामे सुरू…

Read More
Fish Farming

Fish Farming : मांसाहार म्हटलं की माशांचा विषय येतोच. मासे खाणे अनेकांना आवडते. वेगवेगळ्या जातीचे मासे बाजारात उपलब्ध असतात. खाऱ्या आणि गोड्या पाण्यातील मासे बाजारात उपलब्ध होतात. माशांच्या जातीनुसार त्यांचे भाव ठरवले जातात. मात्र आज आपण माशाची अशी एक जात जाणून घेणार आहोत ज्याला किलोला तब्बल 1600 ते 1800 रुपये एवढा भाव मिळतो. आम्ही ज्या जातीबाबत बोलत आहोत तो आहे शेवंड अर्थातच लॉबस्टर मासा. या जातीला चांगला विक्रमी दर मिळतो कारण की आखाती देशांमध्ये या जातीच्या माशाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याची माहिती जाणकारांनी दिली आहे. या जातीला विक्रमी भाव मिळत असल्याने ही मासळी स्थानिक व पारंपरिक मच्छीमारांना चांगला फायदा देणारी…

Read More