Ativrushti Nuksan Bharpai : यावर्षी पावसाच्या लहरीपणाचा शेतकरी बांधवांना (Farmer) मोठा फटका बसला आहे. मान्सूनच्या सुरुवातीला या वर्षी पाऊस थोडा उशीरा आला. यामुळे खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांची पेरणी लांबली शिवाय मध्यंतरी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली यामुळे शेतकरी बांधवांच्या पिकांना मोठा फटका बसला.
सप्टेंबर महिन्यात देखील राज्यात सर्वत्र पावसाचा (Rain) त्राहिमाम् पाहायला मिळाला होता आता परतीचा पाऊस देखील राज्यात मोठा जोमात कोसळत आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांची पूर्णतः नासाडी होत आहे. यामुळे राज्य शासनाने (State Government) राज्यातील शेतकरी बांधवांना मदत म्हणून नुकसान भरपाई (Compensation) देण्याच जाहीर केले होते. त्या अनुषंगाने शासनाकडून निधी देखील आता जारी केला जात आहे.
खरं पाहता हिंगोली जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या महिन्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शासनाकडून 157 कोटी 4 लाख 52 हजार रुपये मदत म्हणून हिंगोली जिल्ह्यासाठी देण्यात आले होते. विशेष म्हणजे ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रोसेस देखील पूर्णत्वास आली आहे. दरम्यान आता 132 कोटी 14 लाख 36 हजार रुपयांचा निधी पून्हा एकदा हिंगोली जिल्ह्याला मिळणार आहे.
मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यांमध्ये पाच तालुक्यांतील जिरायती, बागायती, फळपिके मिळून जवळपास 1 लाख 13 हजार 620 हेक्टरवरील पिकांचं 33 टक्क्यांहून जास्त नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत या नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना आता शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त या शेतकरी बांधवांना तब्बल 132 कोटी 14 लाख 36 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आलीय. हा निधी तब्बल 11 लाख 34 हजार 406 शेतकरी बांधवांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे. निश्चितच यामुळे लाखो शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे.