Ativrushti Nuksan Bharpai : यावर्षी पावसाळी काळात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जून ते ऑगस्ट या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्याला देखील मोठा फटका बसला आहे. दरम्यान जिल्ह्यात परतीच्या पावसाने देखील मोठे थैमान माजवले होते. जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात देखील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.
आता सोयगाव तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकरी बांधवांना अनुदान स्वरूपात मदत मिळावी या अनुषंगाने 50 कोटी 59 लाख 64 हजार रुपयांची मागणी तालुकास्तरावरून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. दरम्यान सोयगाव तालुक्याचे तहसीलदार रमेश जसवंत यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा प्रशासनाकडून अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनुदानाची रक्कम मिळाल्यानंतर लगेचच संबंधित शेतकरी बांधवांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग केली जाणार आहे. त्यामुळे निश्चितच सोयगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी की, खरीप हंगामात सोयगाव तालुक्यात 42 हजार 315 हेक्टर क्षेत्र लागवडीखालील होते. त्यापैकी 37 हजार 368 हेक्टर क्षेत्राला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या अनुषंगाने संबंधित बाधितक्षेत्रातील शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात मदत मिळावी या हेतूने अहवाल तयार करण्यात आला असून सदर अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे सदर अहवालात सोयगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांसाठी अनुदान म्हणून 50 कोटी 59 लाख 64 हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे. सोयगाव तालुक्यात एकूण चार महसूल मंडळ आहेत. या चारही महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार सोयगाव तालुक्यातील या चार मंडळात 33 हजार 127 शेतकरी बांधव अतिवृष्टीमुळे बाधित आहेत.
अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाकडे मागणी केलेला निधी प्राप्त झाल्यानंतर ताबडतोब संबंधित शेतकरी बांधवांच्या खात्यावर अतिवृष्टी नुकसान भरपाईचा निधी जमा केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे तालुकास्तरावर संबंधित शेतकरी बांधवांचे आधार कार्ड, बँक खाते इत्यादी माहितीचे संकलन देखील जोरावर सुरू आहे. यामुळे सोयगाव तालुक्यातील अतिवृष्टी बाधित शेतकरी बांधवांना लवकरच अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळणार असल्याचे समजत आहे. निश्चितच यामुळे सोयगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.