Asafoetida Farming : भारतात मसाला पदार्थांची खपत खूप अधिक आहे. यामुळे भारताला मसाल्यांचा देश असे म्हणून देखील ओळखले जाते. हिंग (Asafoetida Crop) हा देखील एक प्रमुख मसाला पदार्थ आहे. खासकरून भारतीय घरांमध्ये पदार्थांची चव वाढवण्यासाठी हिंगाचा वापर केला जातो. हिंग मध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात, तसेच हिंगाची चव देखील सर्वोत्कृष्ट आहे.
यामुळे खाद्यपदार्थ आणि आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठीही हिंगाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. मात्र, भारतात हिंगाचे उत्पादन खूपच कमी आहे. असं म्हणण्यापेक्षा भारतात हिंग उत्पादित केला जात नाही, असं म्हटलं तरी काही वावगे ठरणार नाही. त्यामुळे इतर देशांतून हिंगाची आयात करावी लागते. मित्रांनो खरे पाहता भारतात अफगाणिस्तान मधून हिंग आयात केला जातो. मात्र आता भारतात हिंग शेती करता येणे शक्य बनले आहे.
हिंग लागवड भारतात कुठे केली जाते बर
हिंगाचा वापर पाहता आता भारतातही त्याच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर त्याच्या लागवडीशी जोडले गेले आहेत. त्याच्या लागवडीसाठी थंड हवामान आवश्यक आहे. इतर राज्यात त्याची लागवड करता येईल का, याबाबत सध्या शास्त्रज्ञांचे संशोधन सुरू आहे. \
यामुळे जर हिंगाची लागवड मैदानी प्रदेशात करता येणे शक्य झाले तर निश्चितच भारतातील बहुसंख्य शेतकऱ्यांना (Farmer) याचा फायदा होणार आहे. सध्या हिंगाची लागवड थंड प्रदेशात केली जात आहे. मात्र भविष्यात मैदानी प्रदेशात देखील याची शेती (Agriculture) करता येणे शक्य होणार असल्याचे जाणकार लोक सांगत आहेत. भारतात हिंग शेती संदर्भात भारतीय संशोधकांचे संशोधन देखील सुरू आहे.
येथून मागवता येणार हिंगाची रोपे
हिंगाच्या लागवडीशी जोडण्यासाठी तुम्ही नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट अँड जेनेटिक डिपार्टमेंटशी संपर्क साधूनही माहिती मिळवू शकता. याशिवाय इथून रोपे मागवून शेतकरी त्याची लागवड सुरू करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हिंग लागवडीसाठी वालुकामय, चिकणमाती असलेली जमीन उत्तम मानली जाते. ज्या ठिकाणी पाणी साचणार नाही अशा ठिकाणी त्याची रोपे लावावीत. पाणी साचल्यास त्याच्या झाडाचे मोठे नुकसान होऊ शकते.
हिंग लागवडीतून कमाई
हिंग लागवडीमुळे उत्पन्नाच्या (Farmer Income) बाबतीत शेतकऱ्यांचे नशीब बदलू शकते. बाजारात एक किलो हिंग 35 ते 40 हजार रुपये किलो दराने विकला जातो. सध्या बाजारात हिंगाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. अशा परिस्थितीत शेतकरी हिंगाच्या व्यवसायातून सहजपणे बाजारपेठेत स्वत:ची स्थापना करू शकतात आणि बंपर नफा कमवू शकतात.