Apple Farming : भारतात वेगवेगळ्या फळ पिकांची लागवड केली जाते. आपल्या देशात डाळिंब, द्राक्ष, केळी, सफरचंद अशा विविध फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यातील सफरचंद पिकाबाबत बोलायचं झालं तर या पिकाची लागवड जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश या दोनच राज्यात पाहायला मिळते.
या पिकाला थंड हवामान आवश्यक असते. तसेच या पिकाची लागवड ही फक्त डोंगराळ भागातच होऊ शकते. अलीकडे मात्र देशातील काही मैदानी भागातील शेतकऱ्यांनी देखील सफरचंदाची यशस्वी लागवड करून दाखवली आहे.
महाराष्ट्रातही काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर सफरचंद लागवडीचा प्रयोग राबवून पाहिला आहे. अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील कृषी वैज्ञानिकांनी सफरचंदाच्या अशा दोन जाती विकसित केल्या आहेत ज्या की उष्ण आणि मैदानी भागात लागवडीसाठी उपयुक्त ठरणार आहेत.
अर्थातच भविष्यात उष्ण आणि मैदानी भागातही सफरचंद पीक नजरेस पडणार आहे. भारतीय कृषी प्रणाली संशोधन संस्था (ICAR-IIFSR), मोदीपुरम मेरठ या कृषी संशोधन संस्थेने उष्ण आणि मैदानी भागात लागवडीसाठी उपयुक्त सफरचंदाच्या दोन जाती विकसित केल्या आहेत.
यामुळे भविष्यात सफरचंद लागवड वधारणार आहे. दरम्यान आता आपण या कृषी संशोधन संस्थेने विकसित केलेल्या या सफरचंदाच्या दोन्ही जातीची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
डार्सेट गोल्डन : ही एक उच्च उत्पादन देणारी आणि उष्ण तसेच मैदानी भागात देखील उत्पादित करता येणारी सफरचंदाची अलीकडेच विकसित झालेली जात आहे. या जातीला मोठ्या प्रमाणात फुलधारणा होते आणि यामुळे यातून चांगले उत्पादन देखील मिळते.
सफरचंदाच्या या नवीन जातीमुळे भविष्यात भारताच्या मैदानी आणि उष्ण भागातही सफरचंदाच्या बागा पाहायला मिळतील. त्यातून शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढणार आहे.
ऍना : ऍना जातीचे सफरचंद उष्ण हवामानात आणि मैदानी भागात उत्पादित करता येऊ शकते. या जातीचे पीक लवकर परिपकव होते. या जातीची फळे जून महिन्यात वाढतात. या जातीची फळे चविष्ट दिसतात. यामुळे बाजारात याला चांगला दर मिळू शकतो. ही एक लवकर परिपक्व होणारी आणि उच्च उत्पन्न देणारी जात आहे.