Apple Farming In Maharashtra : शेतकरी बांधव विविध पिकाची शेती करत असतात. काही पिके ही एखाद्या विशिष्ट हवामानात आणि विशिष्ट कालावधीत येत असतात. यामध्ये सफरचंद म्हटलं की हे पीक कश्मीर आणि हिमाचल प्रदेश या थंड हवामानाच्या प्रदेशातच उत्पादित केल जात.
जम्मू आणि काश्मीर तसेच हिमाचल प्रदेश मधील बहुतांशी शेतकऱ्यांचा मदार सफरचंद पिकावर असतो आणि येथील शेतकरी या पिकातून चांगली कमाई देखील करतात.
निश्चितच तेथील हवामान सफरचंद पिकाला मानवत म्हणून त्या शेतकऱ्यांना या पिकातून चांगली कमाई होते. मात्र अलीकडे हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या थंड हवामानाच्या प्रदेशात उत्पादित होणारे सफरचंद पीक आपल्या महाराष्ट्राच्या मातीत देखील फुलू लागल आहे.
हे पण वाचा :- कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी ! मुंबईहुन कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वे चालवणार ‘ही’ सुपरफास्ट ट्रेन; कुठं राहणार थांबा?
यामध्ये मराठवाड्यासारख्या उष्ण हवामानात देखील हे पीक उत्पादित करण्याची किमया साधली आहे जालना जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने. जिल्ह्यातील मठ पिंपळगाव येथील कैलास जिगे या प्रयोगशील शेतकऱ्याने आपल्या पंधरा गुंठे शेत जमिनीत 100 सफरचंद झाडाची यशस्वी शेती करून दाखवली आहे.
आता या शेतकऱ्याला सफरचंद पिकातून कमाई देखील होत आहे. यामुळे सध्या हा प्रयोग परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. कैलास यांनी दिलेल्या माहितीनुसार आज पासून साधारण 25 महिन्यांपूर्वी म्हणजेच दोन वर्षांपूर्वी त्यांनी सफरचंद रोपांची लागवड केली.
आपल्या 15 गुंठे जमीनीत त्यांनी शंभर सफरचंदाची रोपे लावलीत. आता या झाडांना सफरचंद देखील लागली आहेत. कैलास सांगतात की, त्यांनी सोशल मीडियामध्ये महाराष्ट्रात देखील सफरचंद लागवड होऊ शकते याबाबत वाचले होते.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! 10 मे ला सुरू होणार आणखी एक वंदे भारत ट्रेन; PM मोदी दाखवणार हिरवा झेंडा ! कोणत्या मार्गांवर धावणार? पहा….
यामुळे त्यांनी सफरचंद लागवडीचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने त्यांनी बदनापूर येथून 100 सफरचंदाची रोपे मागवली. जालना जिल्हा म्हणजे उष्ण हवामान असलेला भाग. अशा परिस्थितीत त्यांनी सफरचंदाची उष्णता सहन करणारी जात लागवड करण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी हारमन 99 या जातीची लागवड केली. फेब्रुवारी 2020 मध्ये दहा बाय बारा या अंतरावर या झाडांची लागवड करण्यात आली. लागवड केल्यानंतर एका वर्षातच या झाडांना फळे येऊ लागली मात्र तेव्हा फळे खूपच कमी प्रमाणात लागली होती.
आता मात्र या झाडांना चांगल्या प्रमाणात फळधारणा झाली आहे. कैलास सांगतात की सध्या चार ते पाच किलो माल प्रत्येक झाडांवर असून येत्या 20 ते 25 दिवसात सफरचंद हार्वेस्टिंग केली जाणार आहे.
हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! कोकणानंतर आता म्हाडा मुंबई मंडळाची लॉटरी काढणार; केव्हा निघणार लॉटरी? पहा….
म्हणजेच त्यांना यावर्षी सफरचंद बागेतून जवळपास दीड लाखांपर्यंत ची कमाई होण्याची अशी आहे. ते सांगतात की यंदा फारशी फळधारणा झाली नाही. पण पुढल्या वर्षी अधिक फळधारणा होण्याची आशा त्यांना आहे. अर्थातच उत्पन्नात देखील पुढल्या वर्षी वाढ होईल एवढे मात्र नक्की.
एकंदरीत जालना जिल्ह्यातील या प्रयोगशील शेतकऱ्याने केलेला हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक राहणार आहे. जर शेतीमध्ये काहीतरी नवीन प्रयोग केला अन या प्रयोगाला योग्य नियोजनाची सांगड घातली तर लाखो रुपयांची कमाई कमी जमिनीतून देखील होऊ शकते हेच कैलास यांनी आज दाखवून दिले आहे.
हे पण वाचा :- पुणेकरांसाठी खुशखबर ! आता वाहतूक कोंडीतून होणार सुटका; ‘या’ मार्गावर विकसित होणार नवीन पूल, वाचा…..