Annapurna Yojana : गेल्या शिंदे सरकारने महिलांना केंद्रस्थानी ठेवून अन्नपूर्णा योजनेची सुरुवात केली. महिलांना केंद्रस्थानी ठेवून लाडकी बहीण योजनेसोबतच अन्नपूर्णा योजनेची सुरुवात करण्यात आली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना वर्षातून तीन घरगुती गॅस सिलिंडर मोफत दिले जात आहेत, पण अनेक पुरुषांच्या नावावर गॅस सिलिंडरचे कनेक्शन असल्याने हजारो महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळालेला नाही.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, शिंदे सरकारने अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांना वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. या योजनेचा राज्यातील उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आणि लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे.
मात्र या योजनेचा लाभ हा फक्त ज्या लाडक्या बहिणीच्या नावाने गॅस कनेक्शन आहे त्यांनाच मिळू शकणार आहे. पण लाखों लाडक्या बहिणीच्या नावाने गॅस कनेक्शन नाही. यामुळे पात्र असूनही या योजनेचा अनेकांना लाभ मिळणार नाही असे म्हटले जात होते.
मात्र आता ज्या महिलांच्या नावे गॅस कनेक्शन नाही त्यांना देखील याचा लाभ मिळू शकणार आहे. यासाठी गॅस कनेक्शन हे पुरुषाच्या नावावरून महिलांच्या नावावर करावे लागणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर करण्याची प्रोसेस देखील फारच सोपी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला वर्षातून तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याची शासनाची योजना आहे.
त्यानुसार लाखो लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत. पण अजूनही अनेक महिलांना याचा लाभ मिळतं नाहीये. त्यामागील प्रमुख कारणे म्हणजे, त्या कुटुंबातील गॅस कनेक्शन हे पुरुषाच्या नावे आहे. यामुळे या संबंधित पात्र कुटुंबातील पुरुषांच्या नावे असणारी गॅस जोडणी महिलांच्या नावे करणे आवश्यक आहे.
यासाठी आता त्यांना जवळच्या गॅस एजन्सी किंवा वितरकाकडे जाऊन फक्त साध्या कागदावर अर्ज करून आधारकार्ड जोडून दिल्यास त्यांना कनेक्शनवरील नाव बदलून मिळणार आहे.
त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून दरवर्षी तीन गॅस सिलिंडर मोफत मिळविता येणार आहेत. या योजनेअंतर्गत सुरवातीला संबंधित लाभार्थीस संपूर्ण पैसे द्यावे लागतील, त्यानंतर काही दिवसांनी शासनाचे अनुदान त्या लाभार्थींच्या बॅंक खात्यात जमा होत आहे.