Animal Husbandry : तुम्हीही पशुपालनाचा व्यवसाय करतात का ? अहो मग आजची बातमी पूर्ण वाचा. खरे तर पशुपालनाचा व्यवसाय दुग्ध उत्पादनासाठी केला जातो. मात्र दुधाचा धंदा हा फारच जोखीमपूर्ण आहे हे वेगळे सांगायला नको. या धंद्यात वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागतो.
पशुखाद्याचे वाढत असलेले भाव, दुभत्या जनावरांच्या वाढत असलेल्या किमती, वाढती महागाई, वाढती मजुरी आणि घटत चाललेले दुधाचे भाव यामुळे दुधाचा धंदा आता पशुपालकांना परवडत नाहीये. तथापि अनेकजण आजही पशुपालनाचा व्यवसाय करत आहेत.
शेतीला जोडधंदा म्हणून अनेकांकडून गाय, म्हैस यांसारख्या जनावरांच्या पालनाला महत्त्व दाखवले जात आहे. पण, हा व्यवसाय करताना पशुपालक शेतकऱ्यांना काय अडचणींचा सामना करावा लागतो.
अनेक शेतकऱ्यांकडून गाय, म्हैस कित्येक प्रयत्न करूनहीं गाभण राहत नसल्याची तक्रार केली जात आहे. दरम्यान जर तुम्हालाही अशाच अडचणीचा सामना करावा लागत असेल तर आज आम्ही तुम्हाला एक असे औषध सांगणार आहोत ज्यामुळे तुमची गाय किंवा म्हैस 100% गाभण राहणार आहे.
विशेष म्हणजे हे औषध फक्त वीस रुपयात तयार करता येणार आहे. सर्वात महत्त्वाचे हे औषध पूर्णपणे आयुर्वेदिक आहे. म्हणजे या औषधाचे कोणतेच दुष्परिणाम जनावरांवर होणार नाहीत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या महत्त्वपूर्ण माहिती विषयी.
कोणते आहे हे औषध ?
भारतीय प्राणी संशोधन संस्थेने (IVRI) गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये जनावरांसाठी पोषक लाडू तयार केलेत. या लाडू मध्ये शास्त्रज्ञांनी असे काही पोषक घटक टाकले आहेत, ज्यामुळे गाय असो किंवा म्हैस यांची गर्भधारणेची क्षमता सुधारते.
तसेच शास्त्रज्ञांनी हा लाडू पूर्णपणे आयुर्वेदिक असल्याचे म्हटले आहे. शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, मोलॅसिस, कोंडा, नॉन-प्रोटीन नायट्रोजन, खनिज मिश्रण आणि मीठ या पदार्थांच्या मिश्रणातून हा पौष्टिक लाडू जनावरांसाठी तयार करण्यात आला आहे.
हा 250 ग्रॅम चा एक लाडू बनवण्यासाठी फक्त 20 रुपयांचा खर्च येतो हे विशेष. जर पशुपालकांना हा लाडू बनवायचा असेल तर ते भारतीय प्राणी संशोधन संस्थेकडून याची ट्रेनिंग घेऊ शकतात.
जर गाय किंवा म्हैस गाभण राहत नसेल तर अशा जनावरांना हा लाडू सलग 20 दिवस खाऊ घातल्यास गर्भधारणेची समस्या समूळ नष्ट होऊ शकते. अवघ्या एका महिन्याच्या काळातच या लाडूमुळे शंभर टक्के रिझल्ट पाहायला मिळणार आहेत.
या लाडूमुळे गाय, म्हैस गाभण तर राहणारच आहे. शिवाय यामुळे दुग्ध उत्पादनक्षमता देखील वाढत असल्याचा दावा या संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी यावेळी केला आहे.