Anganwadi Job In Maharashtra : महिलांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता बारावी पास आणि नोकरीच्या शोधात असलेल्या महिलांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. पुणे जिल्हा परिषद अंतर्गत अंगणवाडी सेविकांच्या रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
एकूण 818 रिक्त पदांसाठी ही अधिसूचना काढण्यात आली असून इच्छुक पात्र महिला उमेदवारांना विहित कालावधीमध्ये ऑफलाइन पद्धतीने यासाठी अर्ज सादर करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती संदर्भात आवश्यक सर्व माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- म्हाडाने घर सोडतीच्या अनामत रकमेसंदर्भात घेतला ‘हा’ मोठा निर्णय, घेतलेला निर्णय फायद्याचा की तोट्याचा? पहा….
कोणती आणि किती पदे भरली जातील?
पुणे जिल्हा परिषद अंतर्गत 818 रिक्त पदांसाठी पदभरती आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका 134 पदे, अंगणवाडी मदतनीस 653 पदे आणि उर्वरित पदे मिनी अंगणवाडी सेविकांची राहणार आहेत.
अर्ज कसा आणि कुठे करायचा
या वर नमूद करण्यात आलेल्या तिन्ही पदांसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्ज करताना संबंधित इच्छुक महिला उमेदवाराला स्वतःच्या हस्ताक्षरात अर्ज भरावा लागणार आहे. अर्ज मात्र काळजीपूर्वक भरायचा आहे आणि याच्यात खाडाखोड होणार नाही याची काळजी घ्यायची आहे.
खाडाखोड झालेले अर्ज बाद केले जाऊ शकतात असे अधिसूचनात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान यथायोग्य भरलेला अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसहित संबंधित पात्र इच्छुक उमेदवारांना बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय पुणे जिल्हा परिषद पुणे या ठिकाणी सादर करायचे आहेत.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! सर्वसामान्यांना लवकर घर मिळावे म्हणून म्हाडाला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्यात ‘या’ सूचना; म्हटले की…..
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी बारावी पास असलेल्या महिला उमेदवार पात्र राहणार आहेत. 18 ते 35 वर्षे वयोगटातील महिला उमेदवार या पदांसाठी पात्र राहणार असून त्यांना अर्ज सादर करता येणार आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! आगामी ‘इतके’ दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा हाय अलर्ट