Amrut Bharat Train : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही खूपच उल्लेखनीय आहे. याचे कारण म्हणजे भारतात रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडणारा आहे. रेल्वेचे नेटवर्क देशातील प्रत्येक कोपऱ्याला कनेक्ट करते. कानाकोपऱ्यात रेल्वेचे जाळे पोहोचले असल्याने रेल्वेने प्रवास करण्याला विशेष पसंती दाखवली जाते.
विशेष म्हणजे भारतीय रेल्वेच्या माध्यमातून आपल्या प्रवाशांचा प्रवास आरामदायी व्हावा यासाठी नेहमीच वेगवेगळे निर्णय घेतले जातात. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय देखील याच उद्देशाने घेण्यात आला आहे. ही ट्रेन सर्वप्रथम 2019 मध्ये सुरू झाली होती.
पहिल्यांदा ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवण्यात आली. या पहिल्या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ला प्रवाशांनी खूपच चांगला प्रतिसाद दाखवला. मग काय टप्प्याटप्प्याने देशातील इतरही महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
आतापर्यंत देशातील 34 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी धावत आहे. तर एका मार्गावर दोन वंदे भारत सुरू आहे. म्हणजे देशातील 34 महत्त्वाच्या मार्गांवर एकूण 35 वंदे भारत एक्सप्रेस चालवल्या जात आहेत. नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर दोन वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत.
नंतर ही गाडी भारतातील एक लोकप्रिय रेल्वे गाडी म्हणून उदयास आली आहे यात तीळ मात्र देखील शंका नाही. मात्र या गाडीचे तिकीट दर पाहता ही गाडी फक्त उच्चवर्गीयांसाठी सुरू झाली आहे असा आरोप केला जातो. सर्वसामान्यांना या गाडीचा प्रवास परवडत नाही असे बोलले जात आहे.
त्यामुळे केंद्रशासनावर चांगलीच टिका होऊ लागली आहे. यामुळे आता वंदे भारत एक्सप्रेससारखाचं जलद प्रवास करता यावा यासाठी देशात अमृतभारत ट्रेन सुरू केली जाणार आहे. आधी या ट्रेनला वंदे साधारण एक्सप्रेस ट्रेन म्हणून ओळखले जात होते.
मात्र, आता या गाडीला अमृत भारत ट्रेन असे नाव देण्यात आले आहे. देशातील पहिली अमृत भारत ट्रेन या चालू वर्षातच सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशातील पहिली अमृत भारत ट्रेन 30 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू केली जाणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार या दिवशी अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचे आणि श्री राम विमानतळाचे उद्घाटन देखील होणार आहे. आता आपण देशातील पहिली अमृत भारत ट्रेन कोणत्या मार्गावर धावणार याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या मार्गावर धावणार पहिली अमृत भारत ट्रेन
बिहार मधील सीतामढी ते अयोध्या दरम्यान ही पहिली अमृत भारत ट्रेन चालवली जाणार आहे. या ट्रेनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या गाडीमध्ये एकूण 22 डबे राहतील. हे डब्बे स्लीपर आणि जनरल कोचचे राहतील. गाडी नॉन एसी राहील मात्र या गाडीचा वेग 130 किलोमीटर प्रतितास एवढा राहणार आहे.
या गाडीमध्ये 1800 प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. गाडीचा रंग भगवा आणि राखाडी राहणार आहे. या गाडीचे तिकीट दर मात्र सर्वसामान्यांना परवडेल असे राहील. या गाडीची पहिली सेवा अयोध्या ते माता सीतेची जन्मस्थळी मिथिला, सीतामढी दरम्यान चालवली जाणार आहे.