Onion Rate : खरं पाहता कांदा हे एक नगदी पीक आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कांदा दरात कायमच चढ उतार पाहायला मिळत असल्याने याला बेभरवशाचे पीक म्हणूनच ओळखल जात आहे.
यावर्षी कांदा दराच्या लहरीपणाचा प्रश्न शेतकऱ्यांना चांगलाच भेडसावत आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत कांदा अतिशय कवडीमोल दरात विकला जात होता. पण ऑक्टोबर मध्ये दरात थोडीशी वाढ झाली. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कांद्याला विक्रमी दर मिळाला. मात्र दुसऱ्या पंधरवड्यात दरात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे.
काल-परवा बाजारात येणाऱ्या नवीन लाल कांद्याला चांगला विक्रमी दर मिळत होता. मात्र काही मोजक्याच एपीएमसीमध्ये चांगला दर मिळाला ती पण कमाल दरातच अधिक वाढ होती सरासरी दर दबावातच होते. आज पुन्हा एकदा दरात मोठी घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या कांदा लिलावाची थोडक्यात माहिती जाणून घेऊया.
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज दहा हजार 507 क्विंटल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला शंभर रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2700 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1400 रुपये प्रति क्विंटल नमूद झाला आहे.
जुन्नर आळेफाटा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 9297 क्विंटल चिंचवड कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला सातशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2210 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 1500 रुपये नमूद झाला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 12590 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लीला वाद्य एपीएमसी मध्ये कांद्याला सहाशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1200 रुपये नमूद झाला आहे.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 6,698 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2100 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1225 नमूद झाला आहे.
पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 923 क्विंटल लाल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला साडेचारशे रुपये प्रति क्विंटर एवढा किमान दर मिळाला असून 2000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1375 नमूद झाला आहे.
पुणे मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 321 क्विंटल लोकल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात एपीएमसी मध्ये कांद्याला चारशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून बाराशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव आठशे रुपये नमूद झाला आहे.