Airoli-Katai Naka Freeway Inauguration : नवी मुंबई ते डोंबिवलीचा प्रवास येत्या काही महिन्यात जलद होणार आहे. जस की आपणांस ठाऊकच आहे की, या दोन्ही शहरांदरम्यानचा प्रवास जलद करण्यासाठी ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग विकसित केला जात आहे. एमएमआरडीए अर्थातच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून हा फ्री वे किंवा उन्नत मार्ग विकसित केला जात आहे.
हा फ्री वे नवीन मुंबई आणि डोंबिवलीसाठी एक अति महत्त्वाचा असा प्रकल्प असून या प्रकल्पाबाबत आता एक मोठी माहिती हाती आली आहे. वास्तविक गेल्या काही वर्षांपासून मुंबई शहरात आणि उपनगरात वाहतूक कोंडीची समस्या प्रामुख्याने भेडसावू लागली आहे. त्यामुळे शहरात चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
याच पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि वाहतुकीला चालना देण्यासाठी वेगवेगळे रस्ते विकासाचे कामे केली जात आहेत. हा हाती घेण्यात आलेला ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग देखील याच प्रयत्नाचा एक छोटासा भाग आहे. असं सांगितलं जातं की हा उन्नत मार्ग विकसित झाल्यानंतर नवी मुंबई ते डोंबिवली दरम्यान चा प्रवास मात्र पंधरा मिनिटात होणे शक्य होणार आहे.
हे पण वाचा :- मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस तिकीट बुकिंग बाबत मोठी माहिती ! पहा डिटेल्स
ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग प्रकल्पाबाबत थोडक्यात
हा मार्ग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तयार करत आहे. हा मार्ग जवळपास साडेबारा किलोमीटर लांबीचा राहणार आहे. यामुळे ऐरोली ते डोंबिवली मधील अंतर थेट 10 किलोमीटरने कमी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पाचे काम एकूण तीन टप्प्यात केले जात आहे. दरम्यान यापैकी पहिल्या टप्प्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात ठाणे – बेलापूर रस्ता आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 म्हणजे जुना मुंबई पुणे महामार्ग दरम्यान ३.४३ किमी लांबीच्या रस्त्याचे बांधकाम केले जात आहे. या पहिल्या टप्प्या अंतर्गत दुहेरी बोगदा देखील विकसित केला जात आहे.
हे पण वाचा :- एकदाच ठरलं बाबा….! ‘या’ दिवशी मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकचे उदघाट्न होणार, पहा….
बोगद्याची लांबी 1.69 किलोमीटर असून उर्वरित मार्ग हा उन्हात मार्ग राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्याचे काम हे जवळपास 92 ते 93 टक्के पूर्ण झाले असून बोगद्याचे काम देखील बहुतांशी पूर्ण झाले आहे. दरम्यान आता या पहिल्या टप्प्या अंतर्गत शेवटच्या पीएससी आय गर्डरसह सर्व गर्डर बसविण्यात आले आहेत.
ठाणे- बेलापूर मार्गावरील भारत बिजली जंक्शन ऐरोली येथील एकूण 16 पीएससी आय गर्डर बसविण्यात आले आहेत. अर्थातच या पहिल्या टप्प्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून येत्या काही महिन्यात हा पहिला टप्पा संपूर्णपणे बांधून तयार होणार आहे. निश्चितच, या प्रकल्प अंतर्गत केल्या जाणाऱ्या कामापैकी हे एक महत्त्वाचं काम असून येत्या काही महिन्यात या प्रकल्पाचे संपूर्ण काम पूर्ण होईल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- मच्छिंद्रभाऊ मानलं! कांद्याच्या आगारात फुलवली केळीची शेती, झाली लाखोंची कमाई बनले लखपती
कसे आहेत उर्वरित दोन टप्पे
ऐरोली- काटई नाका उन्नत मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात २.५७ किमी लांबीचा उन्हात मार्ग तयार केला जात आहे. तसेच तिसर्या टप्प्यात कल्याण-शीळ रोड येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ते काटई नाका यांना जोडणारा ६.३० किमीचा पूर्ण उन्नत मार्ग विकसित केला जाणार आहे.
पहिला टप्पा आता उर्वरित दोन टप्प्यांशी कनेक्ट होणार
या प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पहिल्या टप्प्यात ऐरोलीच्या दिशेने शेवटचा गर्डर बसविण्यात आला आहे. तर ठाणे- बेलापूर मार्गावरील भारत बिजली जंक्शन ऐरोली येथील एकूण १६ पीएससी आय गर्डरही यशस्वीपणे बसविण्यात आले आहेत. यामुळे आता प्रकल्पाचे तिन्ही टप्पे एकमेकांशी कनेक्ट होणार आहेत.
एकंदरीत हा उन्नत मार्ग विकसित करण्यासाठी एम एम आर डी ए च्या माध्यमातून जोरात प्रयत्न सुरू असून आगामी काही महिन्यात हा संपूर्ण प्रकल्प बांधून तयार होईल आणि नवी मुंबई ते डोंबिवली हा प्रवास मात्र 15 मिनिटात शक्य होईल असा आशावाद पुन्हा एकदा या निमित्ताने व्यक्त होऊ लागला आहे.
हे पण वाचा :- मुंबईवासियांसाठी खुशखबर ! अखेर मुहूर्त लागला; ‘हा’ महत्त्वाचा रेल्वे मार्ग 15 एप्रिलला होणार सुरू