Ahmednagar-Sambhajinagar Double Railway Line : अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. खरे तर या दोन्ही शहरादरम्यान रोजाना हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात. फेस्टिवल सीझनमध्ये म्हणजेच सणासुदीच्या काळात या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या आणखी वाढते.
या दोन्ही शहरादरम्यान बस आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. यामुळे अहमदनगर ते संभाजीनगर दरम्यान नवीन रेल्वे मार्ग तयार केला जाणार आहे. खरे तर याचा डीपीआर सुद्धा तयार झाला आहे.
हा डीपीआर म्हणजेच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट फक्त एकेरी मार्गाचा आहे. मात्र सरकारकडून दुहेरी रेल्वे मार्गाचा डीपीआर तयार करण्याची सूचना आलीये. यानुसार आता दुहेरी रेल्वे मार्गाचा डीपीआर तयार केला जात आहे.
या डीपीआर चे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून नोव्हेंबर पर्यंत हे काम पूर्ण होईल अशी माहिती समोर आली आहे. म्हणजे अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दुहेरी रेल्वे मार्ग तयार केला जाणार आहे.
यामुळे या दोन्ही शहरा दरम्यानचा प्रवास नजीकच्या काळात आणखी सुपरफास्ट होणार आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा हे दोन्ही विभाग या नवीन दुहेरी रेल्वे मार्गामुळे परस्परांना जोडले जाणार आहेत.
उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जनतेला यामुळे दिलासा मिळणार आहे. दरम्यान आता आपण या दुहेरी रेल्वे मार्ग प्रकल्पाचा संपूर्ण रूटमॅप कसा राहील याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कसा असणार हा दुहेरी रेल्वे मार्ग प्रकल्प?
छत्रपती संभाजी नगर-अहमदनगर रेल्वे मार्ग वांबोरी मार्गे प्रस्तावित करण्यात आला आहे. यामुळे हा दुहेरी रेल्वे मार्ग तयार करताना डोंगरांचा अडथळा येणार आहे.
हा मार्ग साजापूर – आंबेलोहोळ – येसगाव – बाबरगाव – गंगापूर- जामगाव – देवगड – नेवासा – उस्थल दुमला – खारवांडी – शनिशिंगणापूर- मोरे चिंचोरे- ब्राह्मणी असा राहणार आहे.
या मार्गावर एकूण तेरा रेल्वे स्टेशन राहणार आहेत. खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी काल अर्थातच 27 ऑगस्टला छत्रपती संभाजी नगर येथील रेल्वे स्थानकावर झालेल्या रेल्वे प्रश्नांसंदर्भातील बैठकीत ही माहिती दिली आहे.
यावेळी कराड यांनी 16 बोगीच्या पीटलाईनचे काम सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल अन ऑक्टोबर मध्ये याचे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होईल असे सांगितले. तसेच ही पीटलाईन पुढे 24 बोगींची होईल अशीही माहिती दिली आहे.