Ahmednagar Onion Rate : गेल्या जुलै महिन्यापासून कांद्याचा बाजार तेजीत आला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी बांधव समाधानात असल्याचे चित्र आहे. खरंतर जानेवारी महिन्याच्या शेवटी महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील बाजारात कांद्याची आवक वाढली. शिवाय बांगलादेश मध्ये कांदा निर्यात बंद होती, श्रीलंकेत देखील आर्थिक परिस्थितीमुळे कांदा निर्यात बंदच होती.
अशा स्थितीत देशांतर्गत जेवढी मागणी होती त्यापेक्षा अधिक कांदा बाजारात येत होता. अर्थातच कांद्याची मागणी कमी आणि पुरवठा जास्त झाला. यामुळे सहाजिकच बाजारावर याचा परिणाम पाहायला मिळाला. बाजारात कांद्याच्या दरात चांगलीच घसरण झाली.
जानेवारी महिन्याच्या अखेर पासून ते जून महिन्यापर्यंत कांद्याचा बाजार दबावातच राहिला. खरीप हंगामातील लाल कांदा काढणी केल्यानंतर लगेचच विकावा लागत असल्याने कांद्याची आवक वाढतच राहिली. शिवाय मार्च-एप्रिल महिन्याच्या सुमारास उन्हाळी हंगामातील कांदा देखील बाजारात येऊ लागला.
एकंदरीत कांद्याची मागणी कमी आणि पुरवठा जास्त या समीकरणामुळे कांद्याला फेब्रुवारी ते जून या कालावधीत मात्र चारशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. मात्र बांगलादेशमध्ये कांदा निर्यात सुरू झाल्यानंतर कांद्याची मागणी वाढली.
शिवाय लाल कांदा संपल्यानंतर कांद्याची आवक देखील थोड्याफार प्रमाणात कमी झाली, याचा परिणाम म्हणून मागणी अधिक आणि पुरवठा थोडा कमी अशी परिस्थिती तयार झाली आणि कांद्याच्या दरात आता पुन्हा एकदा वाढवू लागली आहे. जुलै महिन्यापासून कांद्याच्या दरात चांगली तेजी पाहायला मिळत आहे.
अहमदनगर, नासिक जिल्ह्यातील अनेक बाजारात कांद्याच्या दरात तेजी आली आहे. मात्र काल झालेल्या लिलावात अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर एपीएमसी मध्ये कांद्याच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे. श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर एपीएमसी मध्ये काल लुज कांद्याच्या 107 वाहनांची आवक झाली होती.
यात 1655 रुपये एवढा कमाल दर कांद्याला मिळाला आहे. कालच्या लिलावात एक नंबर कांद्याला 1350 ते 1655, दोन नंबर कांद्याला 950 ते 1300, तीन नंबर कांद्याला 600 ते 900 आणि गोल्टी कांद्याला 800 ते 1300 रुपयांचा बाजार भाव मिळाला आहे.