Ahmednagar Onion Rate : गेल्या महिन्यापासून म्हणजे जून 2024 पासून कांदा बाजार भाव तेजीत आले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर बाजारभावात सुधारणा झाली असून अजूनही बाजारभावात तेजी पाहायला मिळत आहे. मध्यंतरी अफगाणिस्तान मधून दिल्ली आणि अमृतसर येथील खाजगी व्यापाऱ्यांनी कांदा आयात केली असल्याचे वृत्त समोर आले होते.
त्यामुळे बाजार भाव पुन्हा एकदा गडगडतील अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र सध्या तरी तसे चित्र दिसत नाहीये. राज्यातील बहुतांशी बाजारांमध्ये कांद्याला चांगला समाधानकारक भाव मिळतोय. आज रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी 4,100 प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रामटेक एपीएमसी मध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 4000, कमाल 4200 आणि सरासरी 4,100 असा विक्रमी दर मिळाला आहे. दरम्यान, आता आपण राज्यातील इतर प्रमुख बाजारांमधील कांदा बाजार भाव थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राज्यातील प्रमुख बाजारांमधील कांदा बाजारभाव
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज किमान 1000, कमाल 3100 आणि सरासरी 2650 असा भाव मिळाला आहे.
कोपरगाव शिरसगाव तिळवणी कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 1500, कमाल 2800 आणि सरासरी 2660 असा भाव मिळाला आहे.
जुन्नर ओतूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 1500, कमाल 3110 आणि सरासरी 2500 असा विक्रमी दर मिळाला आहे.
अकोले कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 700, कमाल 3000 आणि सरासरी 2661 असा दर मिळाला आहे.
लासलगाव निफाड कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 1800, कमाल 2911 आणि सरासरी 2801 असा भाव मिळाला आहे.
पुणे मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान दोन हजार, कमाल 3000 आणि सरासरी 2500 असा भाव मिळाला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान 1200, कमाल 3000 आणि सरासरी 2100 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
राहता कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 500, कमाल 3200 आणि सरासरी 2500 असा भाव मिळाला आहे.
दौंड केडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान सतराशे, कमाल 3200 आणि सरासरी 2600 असा भाव मिळाला आहे.