Ahmednagar Onion Rate : गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यानंतर कांद्याचे बाजार भाव पूर्णपणे दबावात आले होते. या निर्णयाचा राज्यातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त फटका बसला. आपल्या राज्यात कांद्याची सर्वात जास्त लागवड होते, यामुळे केंद्राने हा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले.
यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात मोठा रोष पाहायला मिळाला. याचा फटका सत्ताधाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत बसला. महाराष्ट्रात महायुतीचे अनेक उमेदवार पराभूत झालेत. यात काही मंत्र्यांचा समावेश होता हे विशेष.
मात्र लोकसभा निवडणुकीनंतर कांदा बाजाराचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. कांद्याला आता चांगला समाधानकारक दर मिळतोय अन यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचे वातावरण आहे.
आजही राज्यातील अनेक बाजारांमध्ये कांद्याला चांगला भाव मिळाला आहे. आज राज्यातील हिंगणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला सर्वाधिक म्हणजेच 4000 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे.
आज अर्थातच आठ जुलै 2024 रोजी झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान 2600, कमाल 4000 आणि सरासरी 3241 असा भाव मिळाला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून मिळाली आहे.
दरम्यान आता आपण आज अहमदनगर जिल्ह्यातील बाजारांमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
अहमदनगरमध्ये कांद्याला काय भाव मिळतोय
शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात एक नंबर कांद्याला किमान 2400, कमाल 3200 आणि सरासरी 2750 असा दर मिळाला. तसेच दोन नंबर कांद्याला किमान 2000 कमाल 2300 आणि सरासरी 2150 असा भाव मिळाला आहे. तीन नंबर कांद्याला या मार्केटमध्ये किमान 700, कमाल 1800 आणि सरासरी 1550 असा भाव मिळाला आहे.
राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात उन्हाळी कांद्याला किमान 300, कमाल 3200 आणि सरासरी 2300 असा भाव मिळाला आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 400, कमाल 3200 आणि सरासरी 1800 असा भाव मिळाला आहे.
नेवासा घोडेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1000, कमाल 3000 आणि सरासरी 2500 असा भाव मिळाला आहे.