Ahmednagar Onion Rate : लोकसभा निवडणुकीनंतर कांद्याच्या बाजारभाव सुधारणा झाली आहे. यामुळे राज्यातील प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर कमालीच्या समाधान आहे. गेली अनेक दिवस कवडीमोल दरात कांदा विक्री केल्यानंतर आता कुठे शेतकऱ्यांना दिलासा मिळू लागला आहे. महाराष्ट्रातील कांद्याला देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे बाजारभावात सुधारणा झाली असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
आज अर्थातच 12 जुलैला देखील राज्यातील अनेक बाजारांमध्ये कांद्याला समाधानकारक भाव मिळाला आहे. आजच्या लिलावात राज्यातील कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक दर मिळाला आहे. या मार्केटमध्ये कांद्याला कमाल 4500 रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी दर मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 3500, कमाल 4500 आणि सरासरी चार हजार रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी भाव मिळाला आहे. दरम्यान आता आपण अहमदनगर जिल्ह्यातील बाजारांमध्ये कांद्याला काय दर मिळतोय याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
अहमदनगर जिल्ह्यातील कांद्याचे बाजार भाव खालील प्रमाणे
राहता कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान 500, कमाल 3300 आणि सरासरी 2650 असा भाव मिळाला आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 3576 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला किमान 400, कमाल 3232 आणि सरासरी 1816 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज 6496 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. या मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला किमान 1000, कमाल 2930 आणि सरासरी 2650 असा भाव मिळाला आहे.
कोपरगाव शिरसगाव तिळवणी कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज 3520 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. या मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला किमान 1700, कमाल 2935 आणि सरासरी 2800 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज 5824 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला किमान एक हजार, कमाल 3300 आणि सरासरी 2250 असा भाव मिळाला आहे.