Ahmednagar Onion Rate : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आणि निवडणुकीमध्ये कांद्याचा मुद्दा मोठा प्रभावी ठरला. कांद्याच्या मुद्द्यावरूनच सत्ताधाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान हा मुद्दा अजूनही जिवंतच आहे. खरे तर लोकसभा निवडणुकीनंतर कांद्याला चांगला दर मिळतोय. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान देखील आहे.
मात्र नुकतीच दिल्ली आणि अमृतसरच्या बाजारांमध्ये अफगाणिस्तानचा कांदा पाकिस्तान मार्गे दाखल झाला असल्याची बातमी समोर आली आहे. तेव्हापासून पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात नाराजी वाढली आहे. शेतकऱ्यांच्या माध्यमातून अफगाणिस्तानमधून होणारी कांदा आयात तात्काळ प्रभावाने थांबवली गेली पाहिजे अशी मागणी उपस्थित केली जात आहे.
खरे तर सध्या अफगाणिस्तान मध्ये कांद्याला कवडीमोल दर मिळतोय. यामुळे देशातील काही व्यापारी तेथून स्वस्तात कांदा खरेदी करून आपल्या भारतात विक्री करण्याचा डाव आखत आहेत. विशेष म्हणजे अफगाणिस्तान मधून कांद्याची आयात सुरु देखील झाली आहे. सध्या हा कांदा दिल्ली आणि अमृतसरच्या बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. भविष्यात हा स्वस्त कांदा देशातील इतरही बाजारांमध्ये पोहचणार आहे.
यामुळे भविष्यात देशांतर्गत कांदा बाजार भावात मोठी पडझड होण्याची शक्यता आहे. परिणामी, ही आयात थांबवली गेली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. एकंदरीत सध्या भारताच्या कांद्याची आणि अफगाणिस्तानच्या कांद्याची स्पर्धा सुरू आहे. अफगाणिस्तानचा कांदा भारतीय बाजारात दाखल झाल्यानंतरही देशातील अनेक बाजारांमध्ये कांद्याला समाधानकारक भाव मिळतोय.
आज अहमदनगर जिल्ह्यातील राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक 3300 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला आहे. या बाजारात आज कांद्याला किमान 700, कमाल 3300 आणि सरासरी 2700 असा भाव मिळाला आहे. दरम्यान आता आपण राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये आजचे कांदा बाजार भाव थोडक्यात समजून घेणार आहोत.
सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान 2500, कमाल 3200 आणि सरासरी 2800 असा भाव मिळाला आहे.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज लाल कांद्याला किमान 600, कमाल 3100 आणि सरासरी 2200 असा भाव मिळाला आहे.
भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती : भुसावळच्या बाजारात आज लाल कांद्याला किमान दोन हजार, कमाल 2800 आणि सरासरी 2200 असा भाव मिळाला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याची सर्वाधिक आवक झाली होती. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान 1200 कमाल 3100 आणि सरासरी 2150 असा दर मिळाला आहे.
पुणे मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 1200, कमाल 2500 आणि सरासरी 1850 एवढा दर मिळाला आहे.
पुणे खडकी कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 1600, कमाल 2700 आणि सरासरी 2150 असा भाव मिळाला आहे.
पुणे पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान 2500, कमाल 3000 आणि सरासरी 2750 असा भाव मिळाला आहे.