Ahmednagar Onion Rate : अहमदनगर हा जिल्हा कांदा उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण हे कांदा पिकावर अवलंबून असते. दरम्यान आता जिल्ह्यातील काही प्रमुख बाजारात कांदा दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. राज्यातील इतरही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या कांदा दरात घसरण होत आहे.
अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर डिसेंबर 2022 च्या शेवटी कांदा दरात थोडी थोडी वाढ झाली आणि जानेवारी 2023च्या सुरवातीला 1500 रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर कांद्याला मिळाला. मात्र आता परिस्थिती पुन्हा एकदा बदलली असून कांदा ₹1000 प्रतिक्विंटलच्या आसपास सरासरी दरात विकला जात आहे.
कमाल बाजारभाव मात्र दोन हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत नमूद झाले आहेत. जिल्ह्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थातच राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला मात्र 900 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर काल नमूद करण्यात आला. यामुळे निश्चितच भाव वाढीची आशा बाळगून असलेल्या कांदा उत्पादकांना फटका बसत आहे.
याशिवाय संगमनेर एपीएमसी मध्ये देखील काल अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळाली. संगमनेर बाजारात काल बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या सरासरी दराने लाल कांदा विकला गेला आहे. यामुळे निश्चितच कांदा उत्पादक शेतकऱ्यांची गोची होत आहे. दरम्यान आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख बाजारात कांद्याला काय दर मिळाला आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या मार्केटमध्ये 5563 क्विंटल काल कांदा आवक झाली. काल झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान दर शंभर रुपये, कमाल दर 1700 आणि सरासरी दर 900 रुपये नमूद झाला.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या मार्केटमध्ये 6,435 क्विंटल लाल कांदा आवक झाली. काल झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि 1250 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या मार्केटमध्ये 6226 क्विंटल लाल कांदा आवक झाली. या मार्केटमध्ये कांद्याला 1125 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान, 1490 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि 1380 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर नमूद झाला.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या मार्केटमध्ये काल उन्हाळी कांद्याची 225 क्विंटल आवक झाली. उन्हाळी कांद्याला या मार्केटमध्ये 300 रुपये किमान, 1278 रुपये कमाल आणि 1025 रुपये सरासरी दर मिळाला.
श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- काल या मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला दोनशे रुपये किमान 1400 रुपये कमाल आणि 700 रुपये सरासरी दरं नमूद मत झाला आहे. विशेष म्हणजे उन्हाळी कांद्याची अवघी 31 क्विंटल आवक झाली होती.