Ahmednagar Onion Price : कांदा हे महाराष्ट्रातील जवळपास सर्वचं जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. याची लागवड मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातही केली जाते. मात्र सर्वात जास्त लागवड उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन विभागात केली जाते.
उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांमध्ये कांद्याची लागवड विशेष उल्लेखनीय आहे. नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तिन्ही हंगामातील कांद्याचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. दरम्यान याच उत्तर महाराष्ट्रातून कांदा उत्पादकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील एका प्रमुख बाजारात कांद्याला आज विक्रमी दर मिळाला आहे. खरे तर काल पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर एपीएमसी मध्ये लाल कांद्याला तब्बल 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला होता. यानंतर आज अहमदनगर जिल्ह्यातील राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे.
या एपीएमसी मध्ये आज कांद्याला किमान 500, कमाल 4600 आणि सरासरी 34 असा दर मिळाला आहे. दरम्यान आता आपण राज्यातील इतर बाजारांमध्ये आजचे कांदा बाजार भाव अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
अहमदनगर जिल्ह्यातील इतर बाजारांमधील कांदा बाजार भाव
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1500, कमाल 4500 आणि सरासरी 3550 असा भाव मिळाला आहे.
कोपरगाव शिरसगाव तिळवणी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 2000, कमाल 3940 आणि सरासरी 3790 असा भाव मिळाला आहे.
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान 200, कमाल 4200 आणि सरासरी 2200 असा दर मिळाला आहे.
राज्यातील इतर बाजारांमधील भाव
पुणे मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती : किमान 2 हजार, कमाल 3500 आणि सरासरी 2750.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : किमान 2400, कमाल 4000 आणि सरासरी 3200.
जुन्नर आळेफाटा कृषी उत्पन्न बाजार समिती : किमान 2300, कमाल 4300 आणि सरासरी 3500.
सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती : किमान दोन हजार, कमाल 4200 आणि सरासरी 3100.