Ahmednagar Onion Market News : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून मंदीत असलेले कांद्याचे भाव जिल्ह्यात विक्रमी वाढले आहेत. खरंतर, पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः नाशिक विभागातील नासिक आणि अहमदनगर ही दोन जिल्हे कांद्याच्या उत्पादनासाठी संपूर्ण भारतात ओळखली जातात.
नासिक आणि अहमदनगर जिल्ह्यातुन मोठ्या प्रमाणात बांगलादेशला कांदा निर्यात होतो. या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कांदा हे एक मुख्य पीक असून या पिकाच्या उत्पन्नावरच येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. अशा परिस्थितीत या चालू वर्षात जवळपास पाच ते सहा महिने कांद्याला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले होते.
अहमदनगरसह महाराष्ट्रभर फेब्रुवारी महिन्यापासून ते जून महिन्यापर्यंत कांद्याचा बाजार मंदीत होता. कांद्याला मागणी कमी आणि आवक जास्त असल्याने बाजारभाव कोसळले होते. त्यावेळी चांगल्या मालाला देखील मात्र दोन ते तीन रुपये प्रति किलो असा भाव मिळत होता. यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी कर्जबाजारी झालेत. शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता आला नाही.
परंतु आता परिस्थिती बदलली आहे. जवळपास गेल्या एका महिन्यापासून कांदा बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. परिणामी, शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण आहे. प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यात कांद्याच्या भावात चांगली विक्रमी वाढ झाली आहे. काल सहा ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्यातील एका प्रमुख बाजारात कांद्याचे दर तब्बल तीन हजार रुपयांच्या घरात पोहोचले आहेत.
कोणत्या बाजारात मिळाला विक्रमी भाव ?
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल झालेल्या लिलावात उन्हाळी कांद्याला 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल, 300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान आणि 1550 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव मिळाला आहे. काल या एपीएमसी मध्ये 10 हजार 164 क्विंटल उन्हाळी कांदाची आवक झाली होती.