Ahmednagar News : राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ज्यांनी गेल्या वर्षी सोयाबीन आणि कापूस लागवड केलेली असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या खरीप हंगामात म्हणजेच 2023 च्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.
हे अनुदान दोन हेक्टरच्या मर्यादेत मिळणार आहे. म्हणजेच कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कमाल 10,000 रुपये अनुदान म्हणून दिले जाणार आहेत.
तसेच ज्या शेतकऱ्यांनी वीसं गुंठ्यांपेक्षा कमी जमिनीत म्हणजेच अर्धा एकर पेक्षा कमीच जमिनीत सोयाबीन कापसाची लागवड केलेली असेल अशा शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
मात्र हे अनुदान कापूस अन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कधी मिळणार हा मोठा सवाल उपस्थित केला जात होता. दरम्यान आता याचबाबत आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उद्या अर्थातच 21 ऑगस्ट 2024 रोजी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वितरित केली जाणार आहे.
गेल्या वर्षी ज्यांनी कापसाची आणि सोयाबीनची लागवड केली असेल अशा पात्र शेतकऱ्यांना उद्या अर्थातच 21 तारखेला केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनुदानाची रक्कम वितरित केली जाणार आहे.
बीड जिल्ह्यातील परळी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात हा लाभ केंद्रीय कृषिमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते वितरित होणार आहे. हा लाभ वितरित करण्यासाठीच्या पोर्टलचे उद्घाटन उद्या मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे.
कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी ही माहिती दिली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गेल्या वर्षी ज्या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मध्ये पिकांची नोंद केली असेल अशा पात्र शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे.
मात्र हा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आधार संलग्न बँक खात्याची संमती द्यावी लागणार आहे. यासाठीचे संमती पत्र शेतकऱ्यांनी त्यांच्या कृषी सहायकाकडे जमा करायचे आहे.
ज्या शेतकऱ्यांनी हे संमती पत्र दिलेले असेल त्या शेतकऱ्यांना उद्यापासून अनुदानाची रक्कम दिली जाणार आहे. यामुळे राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.