Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. जे तरुण नोकरीच्या शोधात असतील अशा तरुणांसाठी ही बातमी विशेष फायदेशीर ठरणार आहे. खरं पाहता अहमदनगर महापालिकेमध्ये विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांना अहमदनगर महापालिकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल अशा तरुणांनी या पदभरतीचा लाभ घेत लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आव्हान यावेळी केले जात आहे.
या पदभरती अंतर्गत अहमदनगर महापालिकेमध्ये एकूण 18 रिक्त पदांची भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करावा लागणार आहे. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी आणि एएनएम (महिला) या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून यासाठी ऑफलाइन पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज मात्र करायचा आहे.
हे पण वाचा :- MHADA News : बातमी कामाची ! म्हाडाची एकापेक्षा अधिक घरे घेता येतात का? जाणून घायच ना मग वाचा सविस्तर
या पदां संदर्भात शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा यांसारख्या इत्यंभूत माहितीसाठी अहमदनगर महापालिकेने प्रसिद्ध केलेली जाहिरात मात्र पहावी लागणार आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेली पात्रता धारण करणारा उमेदवार या पदभरतीसाठी विहित नमुन्यात अर्ज भरून आरोग्य विभाग, जुनी महानगरपालिका, यतिम खाना समोर, माळीवाडा, अहमदनगर या पत्त्यावर 13 मार्च 2023 पर्यंत अर्ज सादर करू शकणार आहेत. निश्चितच सदर पत्त्यावर 13 मार्चपर्यंत अर्ज सादर होतील या पद्धतीने इच्छुक उमेदवारांना अर्ज पाठवावा लागेल.
हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी ! सरकारी नोकर भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ झाली फिक्स; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार निर्णय
दरम्यान या पदांसाठीची अधिकृत जाहिरात आणि विहित नमुन्यातील अर्ज डाऊनलोड करण्यासाठी अहमदनगर महापालिका पदभरती 2023 या लिंकवर क्लिक करा. तसेच या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण अहमदनगर महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील भेट देऊ शकतात.
अहमदनगर महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देण्यासाठी https://amc.gov.in/ या लिंक वर क्लिक करा. अहमदनगर महापालिकेमध्ये नोकरी करू इच्छिणारे आणि वरील पदांसाठी पात्रता ग्रहण करणारे उमेदवारास 13 मार्च 2023 पर्यंत वर नमूद केलेल्या पत्त्यावर शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचा दाखला, शासकीय अनुभव असलेले प्रमाणपत्र, या कागदपत्रांसहित विहित नमुन्यातील अर्ज व्यवस्थित रित्या भरून पाठवावा लागणार आहे.
हे पण वाचा :- वंदे भारत एक्सप्रेस : आता नागपूरसह संपूर्ण राज्यात ‘ही’ वंदे भारत ट्रेन धावणार; नितीन गडकरीचा मास्टर प्लॅन आला नवीन स्वरूपात