Ahmednagar News : गेल्या काही वर्षांमध्ये अहमदनगर शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत. वेगवेगळ्या महामार्गांची कामे पूर्णत्वास गेली आहेत. उड्डाणपूल, भुयारी मार्ग, बोगदा, ब्रिज, सागरी मार्ग, मोठमोठ्या महामार्गाची कामे संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहेत. अशातच अहमदनगरकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे.
ती म्हणजे शहरात एक नवीन ब्रिज तयार होणार आहे. शहरात एक नवीन उड्डाणपूल विकसित होणार असून यामुळे शहरातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी नियंत्रणात येईल अशी आशा व्यक्त होत आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की अहमदनगर शहरात सक्कर चौक ते कोठला यादरम्यान पहिला उड्डाणपूल विकसित झाला. या उड्डाणपुलामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी खूपच मोठ्या प्रमाणात कमी झाली असून यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
2009 मध्ये आणि 2014 मध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेले दिवंगत भाजप नेते दिलीप गांधी यांनी या उड्डाणपुलासाठी विशेष प्रयत्न केले होते.
नितीन गडकरी यांच्याकडे दिलीप गांधी यांनी या उड्डाणपुलासाठी विशेष पाठपुरावा केला होता. दिलीप गांधी यांच्यानंतर 2019 मध्ये नगरदक्षिणमधून डॉक्टर सुजय विखे पाटील हे खासदार म्हणून निवडून आलेत आणि त्यांनी देखील या उड्डाणपुलासाठी विशेष कष्ट घेतलेत.
सुजय विखे यांनी उड्डाणपुल लवकरात लवकर शहरातील नागरिकांसाठी खुलावा यासाठी पाठपुरावा केला आणि त्यांचा पाठपुरावा यशस्वी होतं हा उड्डाणपूल आकारास आला. मागील वर्षी अर्थातच 2023 मध्ये हा उड्डाणपूल अहमदनगरकरांसाठी खुला झाला आहे.
यामुळे नगर शहरातील नागरिकांच्या माध्यमातून समाधान व्यक्त केले जात आहे. अशातच आता नगरमध्ये आणखी एक नवीन उड्डाणपूल विकसित होणार आहे. दरम्यान या उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी आवश्यक माती परीक्षण नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे.
हा उड्डाणंपुल पोलीस अधीक्षक चौक ते सह्याद्री चौक यादरम्यान विकसित केला जाणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचा प्रवास निश्चितच कोंडीमुक्त होणार आहे. खरे तर शहरात वाढत असलेली वाहतूक पाहता आणखी एका उड्डाणपुलाची गरज होती.
यानुसार हा उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी हा पूल मंजूर करून आणला आहे. पोलीस अधीक्षक चौक, पत्रकार चौक ते एमआयडीसीतील सह्याद्री चौक यादरम्यान हा नवीन उड्डाणपूल तयार होणार आहे.
दरम्यान या उड्डाणपूलासाठी नुकतेच माती परीक्षण पूर्ण करण्यात आले असून हे या प्रकल्पाचे एक महत्त्वाचे काम समजले जात आहे. यामुळे या प्रकल्पाचे बांधकाम लवकरच सुरू होईल आणि खऱ्या अर्थाने शहराचे वैभव यामुळे आणखी वाढणार आहे.