Ahmednagar Kanda Bajarbhav : अहमदनगर जिल्हा हा कांदा उत्पादनासाठी ओळखला जातो. जिल्ह्यातील कांदा लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. नासिक विभागातील नासिक आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात बांगलादेश आणि श्रीलंकेला कांदा निर्यात होत असतो.
शिवाय राज्यात देखील या दोन जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कांदा विक्री होतो. यंदा मात्र या दोन्ही प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यात कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळत आहे.
गेल्या महिन्यात अहमदनगर जिल्ह्यात विशेषतः पहिल्या पंधरवड्यात कांद्याला चांगला समाधानकारक दर मिळत होता. त्यावेळी तीन हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी तर कांद्याला मिळत होता. यामुळे कांदा उत्पादकांच्या आशा पल्लवीत झाल्या.
सप्टेंबर पर्यंत अतिशय कमी दरात कांदा विकला असल्याने आता याची भरपाई निघेल अशी शेतकऱ्यांना आशा होती. पण कांदा दरातील ही तेजी जास्त काळ टिकू शकली नाही नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून कांदा दरात मोठी घसरण झाली. आता जवळपास एक महिना उलटला तरी देखील कांदा दरात सुधारणा होत नसल्याचे चित्र आहे. सध्या कांद्याला 900 ते 1500 रुपये प्रति क्विंटल असा सरासरी दर मिळत आहे.
काल झालेल्या लिलावात राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी कांद्याला मात्र 2200 रुपये प्रति टोटल असा कमाल दर मिळाला आहे. या एपीएमसी मध्ये कांद्याला 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला.
निश्चितच हा दर कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या अपेक्षाप्रमाणे नाही. मात्र इतर एपीएमसीच्या तुलनेत हा दर अधिक आहे. यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. दरम्यान आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावाची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या मार्केटमध्ये 616 क्विंटल लाल कांदा आवक झाली. या लिलावात कांद्याला दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे तसेच एक हजार 500 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या मार्केटमध्ये 45 क्विंटल लाल कांदा आवक झाली. या लिलावात कांद्याला 1201 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1500 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल आणि 1425 रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे.
राहुरी वांबोरी मार्केट :– लाल कांदा प्रमाणेच उन्हाळी कांदा आवक देखील या मार्केटमध्ये झाली. या मार्केटमध्ये 3676 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. या लिलावात उन्हाळी कांद्याला शंभर रुपये प्रति क्विंटल किमान, 1800 रुपये प्रति क्विंटल कमाल आणि 1000 रुपये प्रति क्विंटल सरासरी दर मिळाला.
कोपरगाव मार्केट :- या मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला 300 रुपये किमान 1581 कमाल आणि अकराशे रुपये सरासरी दर मिळाला.