Ahmednagar Kanda Bajarbhav : अहमदनगर मध्ये सध्या कांदा दराबाबत संमिश्र अशी स्थिती पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी कांद्याला चांगला दर मिळत आहे तर काही ठिकाणी कांदा कवडीमोल दरात विकला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक कमालीचे संभ्रमावस्थेत सापडले आहेत.
नुकत्याच झालेल्या लिलावात जिल्ह्यातील कांदा लिलावासाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या राहुरी एपीएमसीमध्ये मात्र साडेनऊशे रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर कांद्याला मिळाला आहे. जिल्ह्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मात्र लाल कांदा थोड्या बऱ्या दरात विक्री झाला आहे. अशा परिस्थितीत आज आपण अहमदनगर जिल्ह्यात कांद्याला कोणत्या एपीएमसीमध्ये किती दर मिळाला याविषयी सर्वप्रथम जाणून घेणार आहोत.
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती :- राहुरी मार्केटमध्ये 7479 क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये कांद्याला 100 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, 1800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि सरासरी दर 950 रुपये नमूद झाला.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या मार्केटमध्ये लाल कांद्याची 8804 क्विंटल आवक झाली. यामध्ये कांद्याला पाचशे रुपये किमान, 2151 कमाल आणि 1325 सरासरी दर मिळाला आहे.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या ठिकाणी लाल कांद्याची 3900 क्विंटल आवक झाली. यामध्ये कांद्याला 1251 किमान, 1600 कमाल आणि 1435 सरासरी दर मिळाला आहे.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :- पारनेर मार्केटमध्ये 13,374 क्विंटल कांदा आवक झाली होती. या मार्केटमध्ये झालेल्या लिलावात कांद्याला तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, दोन हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल आणि 1350 रुपये सरासरी दर मिळाला.
पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या मार्केटमध्ये 175 क्विंटल लाल कांदा आवक झाली. या मार्केटमध्ये झालेल्या लिलावात कांद्याला दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1700 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल आणि 1400 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी धर्म आहे.
राहता कृषी उत्पन्न बाजार समिती :- राहताच्या मार्केटमध्ये लाल कांद्याला सर्वाधिक बाजार भाव नमूद करण्यात आला आहे. या मार्केटमध्ये झालेल्या लिलावात कांद्याला चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2100 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर आणि 1650 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे.
निश्चितचं जिल्ह्यातील बहुतांश एपीएमसी मध्ये सरासरी कांदा दर 1500 रुपये प्रतिक्विंटल च्या आसपास आहेत. मात्र राहुरी मध्ये कांदा दर कमी आहेत. तसेच इतरही एपीएमसी मध्ये असलेले कांदा बाजार भाव शेतकऱ्यांच्या अपेक्षएवढे नाहीत. मात्र डिसेंबर 2022 च्या दुसऱ्या पंधरवड्याशी तुलना केली असता सध्याचे दर हे अधिक आहेत. डिसेंबर मध्ये कांद्याला मात्र 700 ते 800 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत होता. सद्यस्थितीला सरासरी बाजारभाव 15000 च्या आसपास आहेत. शेतकऱ्यांना यामध्ये अजून वाढ होण्याची आशा आहे. तूर्तास मात्र कांदा दरात भविष्यात वाढ होईल की नाही याबाबत जाणकार लोकांकडून स्पष्टपणे असे काही सांगितले जात नाहीये. यामुळे निश्चितच कांदा उत्पादकांची आर्थिक कोंडी होत असल्याचे राज्यात सध्या चित्र पाहायला मिळत आहे.