Ahmednagar Breaking : महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नासिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. येत्या काही दिवसात मकर संक्रांतीचा सण साजरी होणार आहे.
अशातच या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संक्रांतीचे गिफ्ट शिंदे फडणवीस सरकारने देऊ केलं आहे. खरं पाहता, पुणे आणि नाशिक विभागातील या दहा जिल्ह्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या भरपाई पोटी 675 कोटी 45 लाख दहा हजार रुपयाची मदत शिंदे सरकारने जाहीर केली आहे.
ही मदत या संबंधित जिल्ह्यातील सहा लाख 32 हजार 893 शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यासाठी सर्वाधिक मदत दिली गेली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित तब्बल दोन लाख 54 हजार 691 शेतकऱ्यांना 290 कोटी 91 लाख 33 हजाराची मदत महाराष्ट्र शासनाकडून जाहीर झाली आहे.
वास्तविक पाहता, अतिवृष्टी बाधित शेतकरी बांधव गेल्या अनेक दिवसांपासून मदतीची वाट पाहत होते. अखेरकार राज्यातील अतिवृष्टी बाधितांना राज्य सरकारने मकर संक्रांतीच्या आधीच मदत जाहीर करून एक मोठी भेट शेतकऱ्यांना दिली असल्याचे सांगितले जात आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे नुकतेच राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याचा मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. या अनुषंगाने आता शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळणार आहे. आता या संबंधित शेतकऱ्यांना जिरायतीसाठी प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपये, बागायतीसाठी २७ हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रुपये (तीन हेक्टरपर्यंत मर्यादा) मदत मिळणार आहे.
खरं पाहता, आतापर्यंत राज्य शासनाने जून ते ऑक्टोबर या काळातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पाच हजार ६६१ कोटी ३९ लाखांची मदत ऑलरेडी दिली आहे. परंतु सप्टेंबर-ऑक्टोबरमधील सततचा पाऊस व ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून केली जात होती.
यामुळे मग पुणे व नाशिक विभागीय आयुक्तालयाने अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठीचा प्रस्ताव सरकारला पाठवला होता. आता विभागीय आयुक्तांच्या या प्रस्तावावर सरकारने सकारात्मक निर्णय घेतला असून संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अनुदानस्वरूप मदतीचे प्रावधान करण्यात आले आहे.
कोणत्या जिल्ह्यासाठी किती मदत वाचा सविस्तर
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, अहमदनगर जिल्ह्यात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी आणि स्वतःच्या पावसामुळे मोठे नुकसान झालं होतं. हेच कारण आहे की जिल्ह्यासाठी सर्वाधिक मदत शासनाकडून जाहीर झाली आहे. जिल्ह्यातील एकूण २,५४,६९१ शेतकऱ्यांना एकूण २९० कोटी ९१ लाख ३३ हजार इतकी मदत मिळाली आहे.
तसेच पुणे जिल्ह्यातील ५२,९०० शेतकऱ्यांना ४२ कोटी ८३ लाख ९९ हजार इतकी मदत मिळाली आहे.
सातारा जिल्ह्यातील २४,७५४ शेतकऱ्यांना १७,०४,३४,००० इतकी मदत मिळाली आहे.
सांगली जिल्ह्यातील ४५,८६८ शेतकऱ्यांना ४२,२५,१६,००० इतकी मदत मिळाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ६५,१६६ शेतकऱ्यांना ११०,५६,५८,००० इतकी मदत मिळाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील ५,८६२ शेतकऱ्यांना ३,७६,९४,००० इतकी मदत मिळाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील ९८,२१० शेतकऱ्यांना ८९,२०,५०,००० इतकी मदत मिळाली आहे.
धुळे जिल्ह्यात ५७,९६४ शेतकऱ्यांना ५१,०४,१८,००० इतकी मदत मिळाली आहे.
जळगाव जिल्ह्यात २७,३७० शेतकऱ्यांना २७,७६,४०,००० इतकी मदत मिळाली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील १०७ शेतकऱ्यांना ६,६८,००० इतकी मदत मिळाली आहे.