Ahmednagar Breaking : यावर्षी शेतकऱ्यांचे निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठे नुकसान झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांची मोठी नासाडी झाली होती. यामुळे आता पिक विमा काढलेल्या शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईची रक्कम दिली जात आहे.
शिर्डी मतदारसंघातील पिक विमा काढलेल्या बाधित शेतकऱ्यांना आतापर्यंत सहा कोटी 88 लाखांची मदत देण्यात आली आहे. या मतदारसंघातील राहता तालुका व आश्वी सर्कल मधील ५७३८ बाधित शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईची रक्कम पिक विमा कंपनीकडून मंजूर करण्यात आली आहे.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मतदारसंघातील बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विमा नुकसान भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्याच पाठपुराव्याला आता यश आले असून प्रत्यक्षात पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे.
तालुक्यात बहुतांशी शेतकरी बांधवांनी सोयाबीन बाजरी मका या पिकांचा पिक विमा काढला होता. खरीप हंगामात या पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असल्याने संबंधित पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी 72 तासांच्या आत पिक विमा कंपनीला पूर्वसूचना दिली. मग कंपनी आणि कृषी विभागाने याचे सर्वेक्षण केले. यानंतर स्थानिक आपत्तीनुसार झालेल नुकसान या बाबीचे अंतर्गत 7538 शेतकरी बांधवांना पिक विमा नुकसान भरपाई साठी पात्र ठरवण्यात आले.
या अनुषंगाने पात्र शेतकऱ्यांना 6 कोटी 88 लाख 79 हजार रुपये विमा कंपनीकडून मंजूर करण्यात आले आहेत. उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराडे यांनी लवकरच बाधित शेतकऱ्याच्या बँक खात्यात ही रक्कम वर्ग केली जाईल अशी माहिती दिली. खरं पाहता मध्यंतरी पिक विमा कंपनीचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला होता. नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना दहा-वीस रुपये दिले जात होते.
यामुळे शेतकऱ्यांच्या मनात कंपनी विरुद्ध तसेच कृषी विभागाविरुद्ध आणि शासनाविरुद्ध कमालीचा रोष वाढला होता. अशातच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी मतदारसंघातील या शेतकऱ्यांसाठी स्वतः पाठपुरावा केला अखेर मंत्री महोदयांच्या पाठपुराव्याला यश आले आणि अधिक