Ahilyanagar Onion Rate : रविवारी झालेल्या लिलावात महाराष्ट्रातील अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याची सर्वाधिक आवक नमूद करण्यात आली. खरे तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कांदा बाजाराचे चित्र पूर्णपणे पालटले. लोकसभा निवडणुकीच्या आधी कवडीमोल दरात विकला जाणारा कांदा आता विक्रमी दरात विकला जात असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर कांदा बाजारभावात घट येणार असे म्हटले जात होते. मात्र, सध्या तरी तसे काही दिसत नाहीये. राज्यातील अनेक बाजारांमध्ये कांद्याला चांगला भाव मिळत असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. दरम्यान, काल अर्थातच रविवारी महाराष्ट्रातील अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याची सर्वाधिक आवक नमूद करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, काल अहिल्यानगरच्या बाजारात 30 हजार 868 क्विंटल लाल कांदा आवक झाली. कालच्या लिलावात या मार्केटमध्ये लाल कांद्याला किमान 550 कमाल 3850 आणि सरासरी 2975 असा भाव मिळाला.
तसेच नगर जिल्ह्यातील पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 3400 रुपये, राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2550 रुपये आणि राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2050 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला असल्याची नोंद करण्यात आली आहे. एकंदरीत सध्या कांद्याचे दर सर्वत्र तेजीतच आहेत.
नगर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना दिलासा मिळतोय. दरम्यान, आता आपण राज्यातील इतर बाजारांमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारांमधील कांदा बाजारभाव
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 4000, कमाल 5000 आणि सरासरी 4500 असा भाव मिळाला.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : पुण्याच्या बाजारात लोकल कांद्याला किमान तेराशे, कमाल 4933 आणि सरासरी 3117 असा भाव मिळाला. तसेच चिंचवड कांद्याला या मार्केटमध्ये किमान 1900, कमाल 4,605 आणि सरासरी तीन हजाराचा भाव मिळाला.
सातारा कृषि उत्पन्न बाजार समिती : सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला किमान 3 हजार, कमाल 6 हजार 500 अन सरासरी 5 हजार असा भाव मिळाला आहे.
सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 500, कमाल 4210 आणि सरासरी 3600 असा भाव मिळाला आहे.