Agriculture Scheme : येत्या काही दिवसात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरु होणार आहेत. विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणुका झाल्यात की लगेचच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका रंगणार आहेत. अशा परिस्थितीत मतदारांना खुश करण्यासाठी आता केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून राज्यातील शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्राने आणि राज्य शासनाने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर होणार अशी शक्यता आहे.
तत्पूर्वी मात्र केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे सरकारने मोठा शेतकरी त्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
खरेतर, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आगामी सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा आगामी दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा वर्ग होणार हा सवाल गेल्या काही दिवसांपासून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान याच संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. केंद्र शासनाने पीएम किसान योजनेचा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 ला शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार हे याआधीच जाहीर केले होते.
याचा 16 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात 28 फेब्रुवारीला येणार असून महाराष्ट्र राज्य शासनाच्या नमो शेतकरी योजनेचा आगामी दुसरा आणि तिसरा हफ्ता देखील सोबतच शेतकऱ्यांना मिळणार अशी बातमी समोर आली आहे. अर्थातच यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल सहा हजार रुपये जमा होणार आहेत.
पीएम किसान चे 2000 आणि राज्य शासनाच्या नमो शेतकरी चे दुसऱ्या आणि तिसऱ्या हफ्त्याचे 4000 असे एकूण सहा हजार रुपये यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील अशी माहिती समोर येत आहे. विशेष बाब म्हणजे या योजनेच्या हप्त्याचे वितरण यवतमाळ येथून होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 तारखेला यवतमाळ दौऱ्यावर येत असून यवतमाळ जिल्ह्यातील भारी या गावातून आगामी पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्यातील 87 लाख 96 हजार शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. यामुळे निश्चितच दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे यात शंकाच नाही.
या दोन्ही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकमुस्त सहा हजार रुपयाची रक्कम मिळणार असल्याने होळी सणाच्या पूर्वीच शेतकऱ्यांचे तोंड गोड होणार आहे.