Agriculture Scheme : भारतात फळबाग लागवड मोठी लक्षणीय वाढली आहे. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) देखील मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड करत आहेत. विशेष म्हणजे यातून शेतकरी बांधवांना चांगली कमाई (Farmer Scheme) होत आहे.
अशा परिस्थितीत फळबाग लागवडीला चालना देण्यासाठी संपूर्ण भारतवर्षात सरकारकडून तसेच विविध राज्यातून राज्य सरकारकडून (State Government) वेगवेगळ्या योजना (Farmer Scheme) देखील कार्यान्वित केल्या गेल्या आहेत.
शेती व्यवसायाला (Farming) चालना देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी मायबाप शासनाकडून वेगवेगळ्या योजना चालविल्या जातात. हरियाणा राज्य सरकारने (Hariyana State Government) देखील आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी फळबाग लागवडीला चालना देण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत.
आता हरियाणा राज्य सरकार कडून त्यांच्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी खजूर लागवड करणे हेतू अनुदान देण्यास सुरवात केली आहे. हरियाणा राज्य सरकारने त्यातील शेतकरी बांधवांना खजूर लागवड (date farming) करण्यासाठी 1 लाख 40 हजारांचे अनुदान देण्याची योजना सुरु केली आहे. यामुळे हरियाणा राज्यातील शेतकरी बांधवांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. आपल्या अधिक माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की, हरियाणा राज्य सरकारकडून दिले जाणारे अनुदान एकूण तीन टप्प्यात तेथील शेतकरी बांधवांना प्राप्त होणार आहे.
हरियाणात खजुराची लागवड केली जाते का?
कृषी तज्ज्ञांच्या मते, हरियाणाच्या दक्षिणेकडील भागात वालुकामय माती आढळते, जी हरियाणात खजुराच्या लागवडीसाठी अनुकूल आहे. दुसरीकडे, खजुराच्या वनस्पतींच्या विकासासाठी, फळ पिकण्याच्या वेळी तापमान 30 अंश आणि 45 अंश सेल्सिअस असावे, जे दक्षिण हरियाणाच्या बहुतेक भागात असते. अशा परिस्थितीत हरियाणातील हवामान खजूर लागवडीसाठी अनुकूल असल्याने शेतकरी बांधवांना शासनाने सुरू केलेल्या या योजनेचा मोठा फायदा होणार आहे.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, हरियाणाच्या काही भागात क्षारयुक्त माती आणि खारट पाणी आहे, अशा मातीत आणि पाण्यात गहू आणि मोहरीच्या पिकांची लागवड केल्यास शेतकऱ्यांना खूप नुकसान झाले असते. अशा स्थितीत खजूर लागवड केल्यास जमिनीचा योग्य वापर होऊन राज्यातील शेतकऱ्यांना याचा चांगला नफाही मिळू शकणार आहे. राज्यात खजुराच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी या अभियानांतर्गत हरियाणा उद्यान विभागाने रेवाडी जिल्ह्यातील दोन गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर खजुराची लागवडही केली आहे.
खजूर लागवडीसाठी अनुदान
राज्याची माती, हवामान आणि परिस्थिती लक्षात घेऊन हरियाणा सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
याअंतर्गत शेतकऱ्यांना पहिला हप्ता म्हणून 80 हजार रुपये आणि दुसरा आणि तिसरा हप्ता म्हणून 28-28 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
या अनुदानाचा लाभ घेऊन हरियाणातील शेतकरी प्रति एकर 62 खजुराची रोपे लावू शकतात.
या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना राष्ट्रीय फलोत्पादन प्रयोगशाळेच्या रोपवाटिकेतून प्रति रोप 4000 ते 4500 रुपये दराने खजुराची रोपे खरेदी करावी लागणार आहेत.