Agriculture Scheme News : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष प्रणित इंडिया आघाडीला बहुमत मिळाले. मात्र यावेळी भारतीय जनता पक्षाला वैयक्तिक मोठा फटका बसला. कारण की, 2014 आणि 2019 च्या बीजेपीने आपल्या स्वतःच्या बळावर बहुमताचा आकडा पार केला होता. 2024 च्या लोकसभा निवडणूकित मात्र भारतीय जनता पक्ष अशी कामगिरी करण्यास असमर्थ ठरली.
मात्र असे असले तरी आपल्या मित्र पक्षांच्या सहकार्याने भारतीय जनता पक्ष तिसऱ्यांदा सत्तेत आले आहे. दरम्यान आता तिसऱ्यांदा सरकार स्थापित केल्यानंतर 23 जुलैला सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.
या अर्थसंकल्पात शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, सरकारी कर्मचारी अशा विविध घटकातील नागरिकांसाठी मोठमोठ्या घोषणा होतील अशी आशा आहे. येत्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना देखील मोठी भेट मिळणार आहे.
शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या पीएम किसान योजने संदर्भात येत्या अर्थसंकल्पात मोठा बदल होणार असा अंदाज आहे. खरे तर येत्या काही महिन्यात महाराष्ट्रासहित देशातील काही राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.
यामुळे ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला फटका बसला तसा फटका आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये बसू नये यासाठी केंद्रातील सरकार सावध भूमिका घेणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीएम किसान योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे.
पी एम किसान योजना ही 2019 मध्ये सुरू झाली आहे. या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचा लाभ दिला जात आहे. मात्र हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकमुस्त मिळत नाहीत.
दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जाते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना एकूण 17 हप्ते मिळाले आहेत. सतरावा हप्ता गेल्या महिन्यात शेतकऱ्यांना मिळाला आहे.
मात्र आता या योजनेत मोठा बदल होईल आणि या योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम बारा हजार रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते. म्हणजेच पीएम किसान योजनेच्या रकमेत आणखी सहा हजारांची भर पडणार आहे.
मीडिया रिपोर्ट नुसार या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये म्हणजेच एका वर्षात बारा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. याबाबतचा निर्णय हा अर्थसंकल्पात होणार अशी दाट शक्यता आहे.
निश्चितच सरकारने जर असा निर्णय घेतला तर देशभरातील शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बाब राहणार आहे. तथापि पी एम किसान योजनेची रक्कम 6000 वरून 12000 होणार का हे पाहण्यासारखे राहणार आहे.